Ajit Pawar BJP criticism: शरद पवारांचा फोटो बॅनरवर पुढेही कायम राहणार का? अजित पवारांचं एका वाक्यात सूचक उत्तर

Ajit Pawar press conference News : अजितदादांनी पहिल्यांदाच भाजपच्या कारभारावर जोरदार टीका केली. भाजपच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड महापालिका कर्जबाजारी झाल्याचा आरोप त्यांनी केला.
Sharad Pawar| Ajit Pawar
Sharad Pawar| Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद शुक्रवारी पिंपरी चिंचवड येथे शुक्रवारी सायंकाळी पार पडली. या पत्रकार परिषदेत अजितदादांनी पहिल्यांदाच भाजपच्या कारभारावर जोरदार टीका केली. भाजपच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड महापालिका कर्जबाजारी झाल्याचा आरोप त्यांनी केला. याच पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या माध्यमातून शरद पवार यांनी विकास कामे केल्याचे त्यांनी सांगितले. तर शरद पवारांचा फोटो बॅनरवर पुढेही कायम राहणार का? यावर अजित दादांनी सूचक विधान केले.

आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीनंतरही शरद पवारांचा फोटो बॅनरवर पुढेही कायम राहणार का? असा सवाल भर पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारण्यात आला होता. त्यावर अजितदादांनी यावर एका क्षणाचा विलंब न करता तुमच्या तोंडात साखर पडो, असे एका वाक्यात सूचक उत्तर दिले. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

Sharad Pawar| Ajit Pawar
Pune Richest Candidate: पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार भाजपचा! शरद पवारांच्या आमदार पुत्राकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू

अजितदादांच्या या वक्तव्यानंतर भविष्यकाळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांनी दिलेल्या या उत्तरामुळे पुन्हा एकदा आता दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येणार का? अशा चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत.

Sharad Pawar| Ajit Pawar
Panvel municipal election: महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का : एकाचवेळी गठ्ठाभर उमेदवारांची माघार, भाजपचे 7 जण बिनविरोध

महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी (NCP) पिंपरी-चिंचवड पाठोपाठ पुण्यातही एकत्रच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची लढाई ही आता थेट भाजपच्या विरोधात असणार असल्याचे मोठं वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्यात महायुतीसोबत असलेल्या अजित पवारांची राष्ट्रवादी पुण्यात मात्र मित्रपक्ष भाजप विरोधातच शड्डू ठोकणार असल्याचे दिसते .

Sharad Pawar| Ajit Pawar
Ravindra Chavan : युती की स्वबळाची तयारी; रवींद्र चव्हाणांनी ठणकावले, 'महापौर महायुतीचा होणार, कमळालाच मतदान करा'

महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने अजितदादांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड महापालिका कर्जबाजारी झाल्याचा आरोप केला. शहरात लुटारुंची टोळी दिवसाढवळ्या वावरत आहे. तर दुसरीकडे त्यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून शरद पवार यांनी विकास कामे केल्याचे अजित पवारांनी सांगितले.

Sharad Pawar| Ajit Pawar
Eknath Shinde Shivsena : शिवसेनेला हादरा! उमेदवारी नाकारताच माजी नगरसेवकाने ५० वर्षांचा हिशोबच काढला; म्हणाला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com