Solapur News : Umesh Patil : Yashwant Mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : सोलापुरात 'पॉलिटिकल वॉर' : राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांमध्ये जोरदार जुंपली!

Solapur News : "त्यांनी आपल्या लायकीत राहावे..."

सरकारनामा ब्यूरो

Solapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ तालुक्यातील आमदार यशवंत माने आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील (Umesh Patil) या दोघांमध्ये आता राजकीय वाद उफाळून आला आहे. एकमेकांवर जोरदार टीका करत त्यांनी उघडपणे आव्हान दिले आहे. “माझा नाद केला तर मी कोणाला सोडणार नाही, नरखेडच काय, तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही, तुमचा सातबारा अन् सगळी कुंडली बाहेर काढीन, रेकॉर्डिंगचे काय घेऊन बसलात” असा सज्जड दमच आमदार माने यांनी उमेश पाटील यांना दिला आहे.

उमेश पाटील आणि यशवंत माने यांचा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. राष्ट्रवादीचं गड असलेल्या मोहोळ तालुक्यातच राष्ट्रवादी पक्षात संघर्ष पेटला आहे. राष्ट्रवादीचे आमदार विरुध्द राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष असा टोकाचा संघर्ष राष्ट्रवादी अंतर्गतच सुरू झाला आहे. उमेश पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आमदार यशवंत माने यांच्यावर जाहीरपणे जोरदार टीका केली होती. या टीकेलाच प्रत्युत्तर आमदार माने यांनी दिले आहे. मोहोळ येथील मोरवंची या गावात एका कार्यक्रमात ते बोलत होते.

आमदार माने यांनी उमेश पाटील यांच्यावर टिकेची तोफ डागत, त्यांना ओपन चँलेंज दिले. ‘शरद पवारांचे चार वेळा व्यासपीठावर नाव घेता, काय अधिकार आहे तुम्हाला पवारांचे नाव घेण्याचा,ज्या माणसामुळे पद मिळाले, त्यांच्याबद्दल पाच वर्षे आगपाखड करत फिरता लाज वाटायला पाहिजे’ या शब्दात आमदार माने यांनी उमेश पाटील यांच्यावर घणाघाती वार केला.

आपल्या आमदारकीच्या तीन- सव्वा तीन वर्षाच्या कार्यकाळात उमेश पाटील यांच्याबद्दल बरसून टिका केली. माने म्हणाले, ‘उमेश पाटीलांनी जिल्हा कार्याध्यक्षपदाचा वापर करत राष्ट्रवादी एकजूट करण्याऐवाजी, तालुक्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच नुसती भांडणे लावून दिली. जिल्हा राष्ट्रवादीमध्ये दुफळी तयार केली, असा आरोप त्यांनी केला.

बाकीच्यांना बाजूला ठेवणाऱ्या उमेश पाटील यांनी मागील सहा वर्षात केलं तरी काय? ज्यांच्याकडे पाया पडत जिल्हा परिषदेची उमेदवारी पदरात पाडून घेतली, त्यांची तरी त्यांनी थोडीतरी जाण ठेवली का? पक्षातील राजन पाटील यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना वंचित ठेवण्याचे राजकारण त्यांनी केले.

पोलिसांवर दबाव निर्माण करून पक्षाच्या कार्यकर्त्यांनावरच 307 व इतर गुन्हे त्यांनी टाकले. अशा प्रकारचे दबावतंत्र आपण यापुढे चालू देणार नाही.पाटील यांनी आपल्या लायकीत राहावे, असे ही आमदार माने म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT