Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंची सात महिन्यातच जाहीरातींवर कोट्यावधींची उधळपट्टी; आकडा समोर

State Government Advertisement News : शिंदे यांनी अवघ्या सात महिन्यात जाहिरातीवर कोट्यांवधींचा खर्च केला आहे.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केले. तेव्हापासून जनतेच्या मनातील सर्व सामान्यांचे सरकार आम्ही स्थापन केले असे एकनाथ शिंदे प्रत्येक भाषणात सांगतात. मात्र, शिंदे यांनी अवघ्या सात महिन्यात जाहिरातीवर कोट्यांवधींचा खर्च केला आहे.

ही आकडेवारी माहीत अधिकारातून समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी यांनी फक्त सात महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या (State Government) तिजोरीतुन तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपयांची उधळपट्टी केली आहे. माहिती अधिकारात ही माहिती उघड झाली आहे. दिवसाला शिंदे यांनी १९ लाख ७४ हजार रुपयांचा खर्च केला आहे.

Eknath Shinde News
Balasaheb Thorat News : अखेर बाळासाहेब थोरात भूमिका जाहीर करणार? तांबे, पटोले प्रकरणावर बोलणार

शिंदे यांनी महाराष्ट्रात त्यांचे सरकार स्थापन झाल्यापासुन शासनाच्या तिजोरीतुन ४२ कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केल्याची धक्कादायक माहिती माहिती समोर आली आहे. नुकतेच राज्य शासनाकडून ही माहिती उपलब्ध झाली आहे. यात धक्कादायक माहिती अशी की, या खर्चाची सरासरी काढली तर दिवसाला जवळपास १९ लाख ७४ हजार रुपये जनतेच्या खिशातला शासकीय पैशाची उधळपट्टी केल्याचे दिसुन येत आहे.

Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Eknath Shinde News
Congress News : अदानींवरून मोदींची डोकेदुखी वाढली, काँग्रेस दररोज करणार 'ही' कृती..

त्यामुळे सर्वसामन्याच्या खिशातून शासनास जाणाऱ्या या पैशांच्या खर्चावर शासन आतातरी अंकुश लावेल का? असा प्रश्न सामाजीक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. यावर राजकीय वर्तुळाततुनही टिका होत आहे. बारामती (Baramati) येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी, राज्य सरकारकडे शिंदे सरकारने जाहीरातीवर किती खर्च केला, याची माहिती मागितली होती. यादव यांच्या प्रश्नाला राज्य सरकारने उत्तर दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com