Solapur News : तात्या लांडगे
राज्यात मुलींवरील अत्याचार व हल्ले वाढले आहेत. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांतील मुलींना शारीरिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सर्व मुलींना कराटेचे तीन महिने प्रशिक्षण द्यावे, असे आदेश विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालकांनी काढले आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात १२ संकुले आहेत. याशिवाय विद्यापीठाशी संलग्नित ११५ उच्च महाविद्यालये आहेत. या सर्व ठिकाणी सुमारे ३० हजार मुली शिक्षण घेत आहेत. या सर्व मुलींना तीन महिन्यांच्या कराटे प्रशिक्षणातून शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवले जाणार आहे.
मुलींवर हल्ला होत असल्यास किंवा कोणी अत्याचाराचा प्रयत्न करत असल्यास त्यांनी स्वतःचे संरक्षण कसे करायचे, याबद्दल त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. कराटे प्रशिक्षणासाठी मुलींना एक रुपयाही शुल्क द्यावे लागणार नाही. महाविद्यालयांनी सर्व मुलींना मोफत कराटे प्रशिक्षण द्यायचे आहे, असेही आदेशात नमूद आहे.
सत्र परीक्षेनंतर सुरू करा कराटे प्रशिक्षण
मुलींवरील वाढते अत्याचार आणि त्यांच्यावरील हल्ले या पार्श्वभूमीवर मुलींना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी त्यांना तीन महिन्यांचे कराटे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आता पहिली सत्र परीक्षा संपल्यानंतर विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये व विद्यापीठातील संकुलांमधील मुलींना कराटे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासंबंधीचे आदेश संकुलप्रमुख व सर्व प्राचार्यांना दिले आहेत.
-डॉ. अतुल लकडे, संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
प्रशिक्षणाच्या फोटोसह द्यावा लागणार अहवाल
राज्यातील सर्व शाळा, विद्यापीठे आणि उच्च व तंत्रशिक्षण संस्थांमधील मुलींना तीन महिन्यांचा कराटे प्रशिक्षण कार्यक्रम तात्काळ आयोजित करावा. या प्रशिक्षणाच्या कार्यवाहीचा अहवाल फोटोसहित विद्यापीठातील क्रीडा विभागाला द्यावा, जेणेकरून त्याचा अहवाल उच्च शिक्षण संचालनालयास पाठवता येईल, असे आदेश विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक तथा विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. लकडे यांनी काढले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.