Ajinkyarana Patil-Vaishali Sathe
Ajinkyarana Patil-Vaishali Sathe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur University : सिनेटच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अजिंक्यराणा पाटील, वैशाली साठे यांची बाजी

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर (Solapur) विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज (शुक्रवारी, ता. ३० सप्टेंबर) सकाळी दहापासून सुरवात झाली. संस्था प्रतिनिधीतील उमेदवार माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांचे चिरंजीव अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे (Baliram Sathe) यांच्या सून वैशाली साठे आदी उमेदवार विद्यापीठात ठाण मांडून बसले होते. त्यांचा निकाल नुकताच हाती आला असून अजिंक्यराणा पाटील हे १४ मते घेऊन विजयी झाले आहेत, तर वैशाली साठे यांना ११ मते मिळाली आहेत. दोन्ही उमेदवारांनी बाजी मारल्यानंतर आता दुसऱ्या क्रमाकांच्या मतांची मोजणी सुरू असून त्यात बब्रुवान रोंगे, वैभव गांधी आणि अनिल कुलकर्णी यांच्यात चुरस आहे. (Solapur University: Victory of Ajinkyarana Patil, Vaishali Sathe in Senate Election)

दरम्यान, सुरुवातीला विद्यापीठ शिक्षकांची मतमोजणी पूर्ण झाली असून त्यात खुल्या गटातून डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी प्रतिस्पर्धी डॉ. विकास घुटे यांचा पराभव केला. अनुसूचित जमाती प्रवर्गातून डॉ. विकास कडू यांनी प्रतिस्पर्धी डॉ. श्रीराम राऊत यांना पराभूत केले आहे.

विद्यापीठ शिक्षक मतदारासंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाविद्यालयीन शिक्षक, संस्था प्रतिनिधी, अभ्यास मंडळ, ॲकेडमिक कौन्सिल यांची मतमोजणी सुरू झाली आहे. शेवटी पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार करण्याचे नियोजन विद्यापीठ प्रशासनाने केले होते. आता विद्यापीठ, शिक्षक आणि संस्था प्रतिनिधींचा निकाल हाती आला आहे.

उर्वरीत मतदारसंघांची मतमोजणी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी योगिनी घारे यांच्या उपस्थितीत सुरु आहे. मतमोजणीसाठी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी विद्यापीठात उपस्थित आहेत. सायंकाळी सहापर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

अजिंक्यराणांना सर्वाधिक मते

संस्था प्रतिनिधीतून अजिंक्यराणा पाटील, वालचंद समुहाचे वैभव गांधी, स्वेरी कॉलेजचे डॉ. बब्रुवान रोंगे, डॉ. अनिल कुलकर्णी, वैशाली साठे हे पाच उमेदवार रिंगणात होते. दरम्यान, संस्था प्रतिनिधीसाठी ५३ जणांनी मतदान केले आहे. पसंतीक्रमानुसार सर्वाधिक मते अजिंक्यराणा पाटील यांना मिळाली आहेत, दुसऱ्या क्रमांकांची मते घेऊन वैशाली साठे विजयी झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT