navneet Rana-Sunetra Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar successor : ‘अजितदादांचा उत्तराधिकारी नेमण्याची काहींना खूप घाई झालीय; पण आज वेळ पवार कुटुंबांसोबत उभं राहण्याची’

Navneet Rana : अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढची जबाबदारी कोण घेणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सुनेत्रा पवार यांनी जबाबदारी घ्यावी, अशी मागणी करणाऱ्यांना नवनीत राणा यांनी सुनावले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Baramati, 30 January : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली मृत्यूमुळे दादानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी कोण सांभाळणार? याची चर्चा राज्यात सुरू आहे. खासदार सुनेत्रा पवार यांनी ती जबाबदारी घ्यावी, अशा प्रकारचा एक प्रवाह पुढे येत आहे. मात्र, दादांना जाऊन दोनच दिवस झाले आहेत, त्यामुळे एवढी घाई कसली? अशी विचारणा करणाराही एक गट आहे. दादांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत चर्चा करणाऱ्यांना माजी खासदार नवनीत राणा यांनी चांगलेच सुनावले आहे. ‘काही लोकांना खूप घाई झालीय. पवार कुटुंबांना राजकीय सल्ला देण्याची गरज नाही. कोण जबाबदारी घेऊ शकतं आणि कोण काम करू शकतं,’ याची त्यांना चांगली माहिती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

माजी खासदार नवनीत राणा ह्या पवार कुटुंबीयाला भेटण्यासाठी बारामतीत आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. तसेच, २०१९ मध्ये अजितदादांनी उमेदवारीपासून केलेल्या मदतीची त्यांनी आवर्जून आठवण सांगितली. तसेच, अजितदादांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत होत असलेल्या चर्चेबाबत त्यांनी नाराजीची भावना बोलून दाखवली.

नवनीत राणा म्हणाल्या, खासदार सुनेत्रा पवार यांनी राजकीय जबाबदारी घेतली पाहिजे, असे अनेक नेत्यांचं म्हणणं आहे. मला वाटतं की हे फार घाईचं होतंय. अजितदादांना जाऊन एकच दिवस झाला आहे. अजून अजितदादांच्या अंतिम विधीची राखसुद्धा शांत झालेली नाही. पण काही राजकीय लोकं आहेत की, त्यांना खूप घाई आहे.

राजकीय क्षेत्रात काम करत असताना आपली भावना जिवंत ठेवली पाहिजे. पवार कुटुंबावर आज मोठं संकट कोसळलेलं आहे. अजितदादांच्या भरोशावर आज खूप आमदार वेगळे झालेले आहेत. खूप लोकांची भावना त्यांच्याशी जोडली गेलेली आहे. त्या भावनांचा राजकीय नेत्यांनी आदर केला पाहिजे आणि अजितदादांच्या परिवाराला वेळ दिला पाहिजे, असे राणांनी स्पष्ट केले.

नवनीत राणा म्हणाल्या, पवार कुटुंबीय हे राजकीय क्षेत्राशी जोडले गेलेले आहे. आपल्यापेक्षा ते कितीतरी पटीने हुशार आहे. अनेक पटींनी अनुभवी आहे. त्यांना सल्ला देण्याची तुम्हाला आणि आम्हाला गरज नाही. त्यांना माहिती आहे की, कोण जबाबदारी घेऊ शकतं आणि कोण काम करू शकतं. सध्या परिस्थिती अशी आहे की, पवार कुटुंबांच्या दुःखात आपण त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना साथ दिली पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT