ZP Election : अजितदादा गेले निवडणुकातील जोशही गेला! झेडपी निवडणूकीचा प्रचारावर दुःखाचे सावट

Ajit Pawar Death Election Campaign : राजकीय वातावरणात एक प्रकारची शांतता आहे. नेहमी गजबजलेले चौक, सभांनी गाजणारी गावे आणि झेंड्यांनी सजलेले रस्ते सध्या तुलनेने शांत वाटू लागले आहेत.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

ZP Election : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे सावट तिसऱ्या दिवशीही कोल्हापुरातील जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारात दिसून आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारात फटाके, ढोल ताशे, विरोधकांवरील टीकाटिप्पणी टाळल्याचे दिसून येत आहे. मतदानाला अवघे काही दिवस राहिले असतानाही अपघाताच्या घटनेमुळे प्रचारात मात्र जोश दिसेनासा झाला आहे.

राजकीय वातावरणात एक प्रकारची शांतता आहे. नेहमी गजबजलेले चौक, सभांनी गाजणारी गावे आणि झेंड्यांनी सजलेले रस्ते सध्या तुलनेने शांत वाटू लागले आहेत. सकाळच्या सत्रातील प्रचार आज कमीच जाणवला. या निवडणुकांत विकासाचे प्रश्न, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार अशा मूलभूत मुद्द्यांवर राजकीय लढत रंगते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे जाहीर प्रचारावर मर्यादा आल्या आहेत.

अनेक ठिकाणी सभा होत आहेत. पण, फटाकेबाजी, ढोल-ताशांचे वाद्य टाळले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांमध्येच नव्हे तर इतर पक्षांमध्येही शोकाकुल वातावरण आहे. अजित पवार हे केवळ राज्यस्तरीय नेते नव्हते, तर पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर खोल प्रभाव टाकणारे नेतृत्व होते.

Ajit Pawar
Akola Mayor Controversy : महापौरपदी भाजप विराजमान, गोंधळ 'काँग्रेस-AIMIM'चा! बांगड्यांची फेकाफेक, अकोला महापालिकेत राडा, पोलिसांची एंट्री

सहकार, साखर उद्योग, ग्रामविकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वच पक्षांसोबत त्यांचे आपुलकीचे नाते राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या निधनाचा धक्का या निवडणुकीच्या रणधुमाळीवर थेट परिणाम करणारा ठरला आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांसमोरही एक नैतिक पेच निर्माण झाला आहे. आक्रमक प्रचार केल्यास संवेदनशीलतेचा अभाव असल्याचा संदेश जाऊ शकतो, याची जाणीव सर्वच पक्षांना आहे.

परिणामी, भाजप, काँग्रेस, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांचाही प्रचार तुलनेने संयमित झाला आहे. नेते कार्यकर्त्याच्या बैठका घेत आहेत. मात्र, मोठ्या जाहीर सभांमध्ये टीका टाळली जात आहे. घरभेटी, शांत संवाद आणि संघटनात्मक तयारीवर भर दिला जात आहे.

निवडणूक जरी स्थानिक प्रश्नांवर आधारित असली, तरी राज्यातील या दुःखद घटनेचा भावनिक प्रभाव मतदारांच्या मनावर पडताना दिसतो. अंतिम टप्प्यात प्रचाराचा सूर कितपत बदलतो आणि मतदारांचा प्रतिसाद कसा राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar
Nashik BJP Politics : मुंबईसाठी भाजपकडून नाशिकमध्ये तडजोड? शिवसेना व राष्ट्रवादीला सत्तेत घेण्याच्या हालचाली..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com