Rajendra Raut-Dilip Sopal-Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raut Vs Mohite Patil : राऊतांच्या टार्गेटवर आता सोपल अन्‌ मोहिते पाटील : डीसीसी बॅंकेचे दोघांकडील 900 कोटी वसुलीचा उचलला विडा...

Solapur DCC Bank News : सोलापूर विधान परिषद निवडणुकीतील विजयानंतर राजेंद्र राऊत यांनी बार्शी आणि अकलूजमधील ९०० कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या विधानामुळे जिल्ह्यातील राजकारण पुन्हा तापले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 23 June : सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत यांनी अपेक्षेनुसार विजय मिळविला. पण ही संपूर्ण निवडणूक पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजपचे उमेदवार राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याभोवती फिरत राहिली.

राऊत उमेदवार असल्याने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकही या निवडणुकीत आली. विजयानंतर त्यांनी नाव न घेता मोहिते पाटील आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांना टार्गेट करत बार्शीत आणि अकलूजमधील एका परिवाराकडे अकडलेले असे ९०० कोटी रुपये वसूल करणार आहे, असा विडाच आमदार राजेंद्र राऊत यांनी विधान परिषदेतील विजयानंतर उचलला आहे.

सोलापूर विधान परिषद मतदारसंघातून भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी निवडणूक लढवली असली तरी खरी लढत ही खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामध्येच झाली. दोघांचीही प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती.

आमदार राजेंद्र राऊत यांच्या तक्रारीनंतर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची चौकशी लागली होती. त्या चौकशीनंतर तत्कालीन संचालकांवर नुकसानीची जबाबदारी निश्चिती करण्यात आली होती. तसेच, बॅंकेवर प्रशासकही नेमण्यात आला आहे. तो मुद्दा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी मांडल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

मोहिते पाटील यांना उत्तर देताना राऊत यांनी ही निवडणूक विधान परिषदेची असताना त्यांनी ती जिल्हा बॅंकेवर नेली. जिल्हा बॅंकेसाठी मी गेली १६ ते १७ वर्षे मी लढत आहे. चुकीची टोळी बॅंकेत घुसल्याने बॅंक अडचणीत सापडली आहे. आमदार दिलीप सोपल यांचे नाव न घेता, बार्शीत ३०० ते ३५० कोटी, तर अकलूजमध्ये एका परिवाराकडे ५५० ते ६०० कोटी अडकले आहेत. आता मी ही थकबाकी वसूल करणार आहे, असे जाहीर केले आहे.

सोलापूर जिल्हा दूध संघ (दूध पंढरी) कोणामुळे बंद पडला, हे सर्वांना महिती आहे. तीन अनेक सहकारी संस्था विकून खाल्ल्या आहेत. अनेक संस्था बुडवल्या आहेत. मोहिते पाटील यांनी एक तरी संस्था टिकवली आहे का, असा सवालही राऊत यांनी विचारला आहे.

जिल्हा दूध संघ पुन्हा ताकदीने उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. तसेच, आगामी काळात डीसीसी बॅंक आणि जिल्हा दूध संघाची निवडणूक लावू आणि चांगली माणसं निवडून आणू, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT