IPS Sameer Shaikh sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : SP समीर शेख यांची अवैध धंद्यांच्या उच्चाटनाची मोहिम...

यापुढेही ही अवैध धंद्यांवरील कारवाईची Action against illegal businesses मोहिम सुरू राहणार असल्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख Satara SP Sameer Shaikh यांनी सांगितले आहे.

Umesh Bambare-Patil

सातारा : साताऱ्याचे नुतन पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या समुळ उच्चाटनाची मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार प्रत्येक पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या अवैध कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत २० विविध गुन्ह्यात ५६ आरोपींवर कारवाई करून त्यांच्याकडून दीड लाखांवर अवैध मुद्देमाल व रोकड जप्त करण्यात आली आहे.

गडचिरोली येथून साताऱ्यात बदलून आलेले नवीन एसपी समीर शेख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आता अवैध धंद्यांची उच्चाटनाची मोहिम हाती घेतली आहे. तसेच महामार्गालगतच्या धाबे, हॉटेल्सची तपासणी करून तेथे अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याची सूचना सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

त्यामुळे सध्या पोलिसांनी प्रत्येक तालुक्यात अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत पोलिसांनी २० अवैध जुगार अड्ड्यांवर छापे टाकले आहेत. त्यातून ५६ आरोपींवर कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख ६१ हजार ५९३ रूपयांचे अवैध जुगाराचे साहित्य, रोकड असा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सातारा शहर पोलिस ठाण्यातंर्गत १२, शाहुपूरी पोलिस ठाण्यातंर्गत आठ ठिकाणी कारवाई केली.

तसेच अवैध दारू धंद्यावर छापे टाकून दारूबंदी कायद्यान्वये सातारा तालुका पोलिसांनी एक, औंध पोलिसांनी एक, वडुज पोलिस ठाण्याने चार तर बोरगाव पोलिसांनी एक असे सात गुन्हे दाखल केले आहेत. अवैध धंद्यावरील संयुक्त कारवाईत सात गुन्ह्यात आठ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. यातून सात हजार ४७० रूपयांचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. यापुढेही ही अवैध धंद्यांवरील कारवाईची मोहिम सुरू राहणार असल्याचे पोलिस अधीक्षक समीर शेखर यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT