पश्चिम महाराष्ट्र

Nagar ST service Stopped : जालन्यातील संघर्षामुळे नगरमध्ये एस.टी. सेवा ठप्प ; प्रवासी, विद्यार्थ्यांची गैरसोय

Maratha Protest : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आणि गोळीबारामुळे आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे.

राजेंद्र त्रिमुखे

Nagar Political News : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आणि गोळीबारामुळे आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. या संघर्षामुळे वातावरण चांगलचं चिघळलं असून याचे पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहेत. राज्यभरात या संघर्षाचा निषेध करत सर्वच विरोधीपक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते ठिकठिकाणी आंदोलने करत असल्याने हा संघर्ष आता टोकाला गेला आहे. या घटनेचा निषेधार्थ एसटी महामंडळाच्या बसेसची जाळपोळ आणि तोडफोड होण्याचे प्रकारही समोर आले आहेत.

नगर जिल्ह्यातील संपूर्ण राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा काल (2 सप्टेंबर) पासून बंद ठेवण्यात आली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी एसटी बस सेवा बंद असल्याची माहिती जिल्हा नियंत्रक मनीषा सकपाळ यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली. (Nagar News)

Jalna Protest : ‘देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदावरून पायउतार व्हावे’जिल्ह्यातील सर्वच 11 एसटी डेपोच्या जवळपास 630 बसेल बंद आहेत. त्यामुळे प्रवाशी-विद्यार्थी यांची मोठी गैरसोय होत आहे. पोलीस विभागाने बसेस पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून बस सुरू करण्याबाबत सूचना येई पर्यंत नगर जिल्ह्यातील बसेस बंदच राहतील, अशी माहिती सकपाळ यांनी यावेळी दिली.

जालना येथील घटनेनंतर मराठा आरक्षणाचा अनेक ठिकाणी संतप्त आंदोलकांनी विशेष करून एसटी बसेसना लक्ष केले असून बसेस जाळल्या. अनेक बसेसची तोडफोडही करण्यात आली. त्यामुळे सध्यातरी सार्वजनिक सेवा देणारी लाल परीची सेवा संपूर्ण नगर जिल्ह्यात बंद आहे.

काही दिवसांपूर्वीच नगर जिल्ह्यात राज्य सरकारच्या "शासन आपल्या दारी" कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील 600 बसेस आरक्षित केल्याने प्रवाशी-विद्यार्थी यांची मोठी गैरसोय झाली होती. यावर विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी टीका केली होती. आता पुन्हा मराठा आरक्षण मुद्यावर पोलिसांच्या सुचनेने नगर जिल्ह्यातील एसटी बस सेवा गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झालेली आहे.

एसटी बसेस बंद असल्याने पुणे-औरंगाबाद आदी मोठ्या शहरात जाणाऱ्या प्रवाशांना पाचशे ते हजार रुपये देऊन खाजगी प्रवाशी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. यात नोकरदार,विद्यार्थी, व्यापारी यांना मोठ्या आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Edited By - Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT