Jalna Protest : ‘देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदावरून पायउतार व्हावे’

Devendra Fadanvis must resign as Home Minister-अंतरवली सराटी येथील मराठा आंदोलकांवरील लाठीमाराचा सटाण्यात निषेध
Maratha protest at Satana
Maratha protest at SatanaSarkarnama

Shivsena, NCP protest on Jalna issue : अंतरवेली (जालना) येथील लाठीमाराचा निषेध करावा तेव्हढा थोडाच आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांविरोधात पद्धतशीरपणे हे कटकारस्थान राबविले गेले आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी केली आहे. (Shivsena & NCP agitation against State Government on Jalna Maratha incident)

सटाणा (Nashik) शहरात शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (NCP) शनिवारी आंदोलन करण्यात आले. याबाबत पोलिसांनी (Police) अतिशय अमानुषपणे हा लाठीचार्ज केला आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा.

Maratha protest at Satana
Nashik ‘Maratha’ News : नाशिकमध्ये पोलिसांनी केली रात्रभर धरपकड!

याबाबत माजी आमदार चव्हाण यांनी, या घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी. तसेच गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. या या मागण्यांसाठी शनिवारी बागलाण तालुका व सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बागलाण तहसील कार्यालयासमोर शिंदे सरकारच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन छेडण्यात झाले.

श्री. चव्हाण म्हणाले, जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी अत्यंत शांततेत सुरू असलेले आंदोलन केंद्र व राज्य शासनाने दडपशाहीने मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांनीही देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला सत्ता द्या, आम्ही ९५ दिवसात मराठा समाजाला आरक्षण देऊन असे जाहीर केले होते. मात्र सत्तेत येऊनही मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कोणतीही ठोस पावले त्यांनी उचलली नाही. यामुळे मराठा समाजामध्ये शासनाबद्दल असंतोष वाढत असून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. यांनी स्पष्ट केले.

Maratha protest at Satana
Anil Gote News : ‘मराठा’ आंदोलनाला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान रचले!

आंदोलकांना शिंदे-फडणवीसांच्या पोलिसांनी गुरा-ढोरासारखे झोडपले. उपोषणस्थळी उपस्थित असलेल्या महिलांवरही अमानुषपणे लाठीमार केला. ही कृती कोणाच्या सांगण्यावरून केली, याचे उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवे. हेच का जनतेच्या हिताचे सरकार? सरकारच्या आदेशाशिवाय हे होऊ शकत नाही.

माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, शहराध्यक्ष साहेबराव (गब्बर) सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील आवारासमोर राज्यातील शिंदे सरकारच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी केली.

Maratha protest at Satana
Nashik ‘Maratha’ News : नाशिकमध्ये पोलिसांनी केली रात्रभर धरपकड!

तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले. माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, पांडुरंग सोनवणे, ज्येष्ठ नेते जिभाऊ सोनवणे, शहर कार्याध्यक्ष मनोज छोटू सोनवणे, तालुका कार्याध्यक्ष संजय पवार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुमीत वाघ, सनी देवरे, आराईचे सरपंच दिलीप सोनवणे, जनार्दन सोनवणे, झिपरू सोनवणे, विकी सोनवणे, रमेश सूर्यवंशी, नंदू सोनवणे, रत्नाकर सोनवणे, किरण सोनवणे, सुरेखा बच्छाव, शमा दंडगव्हाळ, उषा भामरे, मिलिंद शेवाळे, हितेंद्र बागूल, निखिल पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com