NCP SP MLA Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP SP : भाजपला पाठिंबा देणं राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना भोवणार : थेट पवारांनी घेतली दखल, प्रदेशाध्यक्षांचे कारवाईचे संकेत

Shashikant Shinde : सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तीन आमदारांवर पक्षांतर्गत कारवाईचे संकेत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिले.

भारत नागणे

Pandharpur, 14 June : विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तीन आमदारांवर पक्षांतर्गत कारवाई करण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी रविवारी (ता. १४ जून) पंढरपुरात येथे बोलताना दिले. त्यामुळे अवघे दहा आमदार असलेल्या राष्ट्रवादीकडून आपल्याच तीन आमदारांवर कारवाई होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे आज पंढरपुरात आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आमदारांवरील कारवाईचे संकेत दिले.

सोलापूर विधान परिषद निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरु आहे. भाजप विरुध्द महाविकास आघाडी असा सरळ सामना होत आहे. दरम्यान शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील, उत्तम जानकर आणि नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या विरोधात उघड बंड पुकारले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या या तीन आमदारांनी भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीला ही तीनही आमदार उपस्थित होते.

याविषयी प्रदेशाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांना आज विचारले असता ते म्हणाले की, अजूनही त्यांची मनधरणी करण्याचे काम सुरु आहे. पक्षाच्या विरोधात जाऊन विरोधी पक्षाला मदत करणे हे चुकीचे आहे. त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा. त्यांच्याशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न करु. स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या प्रकाराची दखल घेतली आहे

निवडणुकीनंतर पक्षाची बैठक होणार आहे. जे आमदार पक्षविरोधी भूमिका घेतील त्यांच्या विरोधात कोणती कारवाई करायची, याची सविस्तर चर्चा बैठकीत केली जाणार आहे, असेही माजी अमदार शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले. दरम्यान तीनही आमदारांच्या पक्षविरोधी भूमिकेची दखल थेट शरद पवारांनी घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT