

Solapur, 14 June : सोलापूर जिल्ह्यात म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी (ता. माळशिरस) गावाजवळ असलेल्या विहिरीत पीकअप जीप कोसळून १४ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात दोघे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
अपघातील मृत हे पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावाचे असल्याचे सांगण्यात येत आहेत. यामध्ये सुरवसे आडनावाच्या व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती आहे. चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती आहे.
पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील १६ लोक पीकअप जीपमधून म्हसवडमधील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. अमावस्यानिमित्त हे लोक सिद्धनाथाच्या दर्शनासाठी म्हसवडमध्ये गेले होते. सिद्धनाथाचे दर्शन घेऊन हे लोक गावाकडे परतत होते. त्या वेळी हा अपघात झाला आहे.
म्हसवड-पंढरपूर मार्गावर माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावालगत आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटून पीकअप जीप विहिरीत कोसळली आहे. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाली आहेत.
या अपघात मृत्यू झालेल्यांमध्ये बहुतांश लोक हे सुरवसे आडनावचे आहेत. ते सर्वजण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील आहेत. या मृतांमध्ये चार महिला आणि चार मुलांचा समावेश असल्याची माहिती आमदार उत्तम जानकर यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.