Subhash Deshmukh-Dattatray Bharane
Subhash Deshmukh-Dattatray Bharane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमचे पाणी पळवाल; तर सोलापुरात पाय ठेवू देणार नाही : देशमुखांचा भरणेंना इशारा

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या हक्काचे उजनी धरणातील (Ujani dam) पाणी पळवाल, तुम्हाला सोलापुरात पाऊल ठेवू देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांना दिला आहे. देशमुख यांच्या पवित्र्याने उजनीच्या पाण्यावरून सोलापुरात पुन्हा संघर्षाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे आगामी काळात सोलापुरात उजनीचे पाणी पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. (Subhash Deshmukh's warning to Dattatray Bharane on Ujani dam water)

बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावत इंदापूर तालुक्यासाठी लाकडी निंबोडी योजना मंजूर केली आहे. त्याला उजनी धरणातून पाणी पळविल्याचा आरोप करत भरणे यांना लक्ष्य करण्यात येत आहे. भरणे यांच्या विरोधात आता भाजपने उडी घेतली आहे. दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी थेट सोलापुरात पाऊल न ठेवू देण्याचा इशारा दिला आहे.

आमदार सुभाष देशमुख म्हणाले की, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे आपण इंदापूरचे लोकप्रतिनिधी जरूर आहात. मात्र, तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे पालक आहात. पण, ज्यावेळी तुम्ही एका जिल्ह्याचं पालकत्व घेताय, त्यावेळी जिल्ह्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, अशी आपली भूमिका असली पाहिजे. परंतु, भरणेमामा आपण निष्ठर आणि स्वार्थीपणे वागत आहात. त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय सर्व नेत्यांनी एकत्र येऊन पाण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे.

त्याचबरोबर उजनी धरणातील पाण्याचा एकही थेंब हा पुणे जिल्हा, इंदापूर तालुका, बारामती तालुक्याला जाऊ देणार नाही. पाणी पळवणारे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांना सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेऊ देणार नाही, असं आव्हानही माजी सहकार मंत्री देशमुख यांनी दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT