Sudhir Mungantiwar- eknath Shinde  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP News: 'भाजपनं एकनाथ शिंदेंचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केल्यास...'; माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांचं पंढरपुरातून मोठं विधान

Mahayuti Government : एकीकडे शरद पवारांना एनडीए सोबत घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं राजकीय महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू आहे. या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

भारत नागणे

Pandharpur News: भाजप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कदापी राजकीय महत्त्व कमी करणार नाही. परंतु भाजपने तसा प्रयत्न केला, तर तो जनता खपवून घेणार नाही, असं मोठं विधान माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी(ता.15 जुलै) पंढरपुरात केले.

एकीकडे शरद पवारांना एनडीए सोबत घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं राजकीय महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू आहे. या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राजकारणात कोणीच कोणाचं महत्व कमी करू शकत नाही. असं व्यक्तिगत कोणाचं महत्त्व कमी करण्याचं काहीच कारण नाही. जनता जोपर्यंत त्यांच्यासोबत आहे, तोपर्यंत कोणीही त्यांचं महत्त्व कमी करू शकत नाही. एकनाथ शिंदे हे आमचे मित्र आहेत. त्या व्यक्तीच्या चुका त्या पक्षाचं महत्त्व कमी करत असतात,अशी महत्त्वाची आणि तितकीच सूचक टिप्पणी मुनगंटीवार यांनी केली आहे.

मुनगंटीवार म्हणाले, जेव्हा भाजप सत्तेत नव्हती, महाविकास आघाडीची सत्ता होती. त्यावेळी सत्तेतून बाहेर पडणे हे एक क्रांतिकारी पाऊल होते. विरोधातून पक्ष फुटणे याला आपण एक नैसर्गिक बाब समजू शकतो. आजपर्यंत या देशांमध्ये काँग्रेसने जेव्हा जेव्हा पक्ष फोडला, तो विरोधी पक्ष होता. पहिल्यांदाच असे घडले आहे की, सत्तारूढ पक्षाचे आठ मंत्री आठ मंत्री, चाळीस आमदार आणि दहा अपक्षांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे भाजप सोबत आले.

एकनाथ शिंदे व त्यांचा शिवसेना पक्ष आमचा सहकारी आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांचे कदापी महत्व कमी करणार नाही. शरद पवार यांचा पक्ष एनडीए सोबत येणार नाही, असे विधान मुख्यमंत्र्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच केले आहे. त्यामुळे आता वाट बघावी लागेल. मात्र, पवारांचा पक्ष एनडीए सोबत येईल का याबाबत व्यक्तिशः मला शंका आहे.

मात्र, शरद पवार यांचा पक्ष एनडीएचा घटक झाला तर पंधरा दिवसापूर्वी बोललेल्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबद्दल जनतेच्या मनात विश्वास राहणार नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या विधिमंडळात अनेक प्रश्न मांडत असताना देखील आपण मंत्रिमंडळातून बाहेर आहे असे विचारले असता "देवाची इच्छा" असे उत्तर त्यांनी दिले. यावेळी कुठला देवा असाही प्रश्न पत्रकारांनी करताच देवाचीच इच्छा असेल त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT