Farmers Loan Waiver: 'एखादी घोषणा झाली की, लगेच दुसऱ्या मिनिटाला खात्यात पैसे कसे जमा होतील..?'; पंकजा मुंडेंनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन विरोधकांना फटकारलं

Mahayuti Government: महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफीची अखेर घोषणा केली आहे. या घोषणेनंतर आता राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2026 च्या निकषांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
pankaja munde
pankaja mundesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफीची अखेर घोषणा केली आहे. या घोषणेनंतर आता राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2026 च्या निकषांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयावर मंगळवारी (ता.14) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले होते. यावर आता मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे.

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी(ता.15 जुलै) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर भाष्य केलं. त्या म्हणाल्या, शेतकर्‍यांसाठी आमच्या सरकारनं कर्जमाफी करत मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा हा निर्णय घेतला आहे. त्यांच्याकडेच सध्या अर्थखातं असून ते चांगलं सांभाळत आहे. एक शेतकरी म्हणूनही मी कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल त्यांचं अभिनंदन करते आणि आभारही मानते.

जो कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे, आत्ताच्या वातावरण बदलाच्या काळात राज्यातील शेतकर्‍यांसाठी मोठा दिलासा ठरला आहे. असाच दिलासा देण्याचा ट्रेंडही यापुढेही सुरू राहील असा मला विश्वासही पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर अजूनही शेतकर्‍यांच्या खात्यात पैसै जमा झाले नसल्याचा प्रश्न यावेळी पत्रकारांनी केला. त्यावर पंकजा मुंडे यांनी कोणतीही एखादी घोषणा झाल्यानंतर लगेच दुसर्‍या मिनिटाला खात्यात पैसे कसे जमा होणार? असा प्रतिप्रश्न केला.त्यांनी कर्जमाफीसाठी एक प्रक्रिया आहे, सरकार आहे, तसेच भव्य कर्जमाफीच्या योजनेसाठी मोठी अमाऊंट आहे. असंख्य शेतकरी आहे, त्यांच्या जमीन आणि कर्जाचं मूल्यांकन करावं लागणार असल्याचं मुंडे यांनी म्हटलं.

pankaja munde
Bogus Seeds: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही! बोगस बियाणांसाठी जबाबदारी होणार निश्चित; कृषी मंत्र्यांचा नेमका प्लॅन काय?

पंकजा मुंडे यांनी यावेळी जर समजा सरकारनं एखादी योजना जाहीर केली की, लगेच तुमची आरडाओरड सुरू होते की, अजून पैसे कसे नाही आले. अरे, कालच आमच्या जयकुमार रावल यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि कर्जमाफीचा निर्णय अधिवेशनात झाला आहे, जे शुक्रवारी संपलं आहे.

एखादी मोठी योजना राबवताना तिची सर्वबाजूने पडताळणी करणं आवश्यक असतं. आमच्याच महायुती सरकारनं एवढ्या वेगानं आणि पारदर्शक पद्धतीनं काम करण्याची सवय लावली असल्याचा टोलाही पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला.

pankaja munde
Shivsena News : एकनाथ शिंदेंचा डाव फसला, ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फुटण्याचा धोका टळला; 'मातोश्री' वरील बैठकीनंतर नाशिकमधील नगरसेवकांचा निर्णय

तसेच मला पूर्ण विश्वास आहे की, येत्या 30 जुलैच्या आत शेतकर्‍यांचे कर्जमाफी संदर्भातले सर्व प्रश्न सोडवले जातील. मंत्रिमंडळ बैठकीचा संदर्भ देत पंकजा मुंडे यांनी आमचं सरकार हे कर्जमाफीच्या संपूर्ण प्रक्रियेवर अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचंही सांगितलं. प्रशासन यंत्रणांकडूनही ही कर्जमाफीचा टप्पा वेळेत पूर्ण गाठण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. मात्र,यावेळी त्यांनी आमच्या सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी पूर्ण आनंदी असल्याचा दावाही मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com