Sujay Vikhe Patil Statement On Pankaja Munde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sujay Vikhe Patil Statement: पंकजा मुंडे यांचा DNA भाजप'चा; पक्ष सोडणार नाहीत; खासदार सुजय विखेंना विश्वास!

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बीआरएस (BRS) आणि केसीआर (KCR) हे परवलीचे शब्द बनले आहेत. बीआरएस अर्थातच भारत राष्ट्र समिती तेलंगणमध्ये सध्या सत्तेत असलेले के चंद्रशेखर राव यांचा हा पक्ष आता महाराष्ट्रामध्ये पाय रोवू पाहत आहे. आणि त्या दृष्टीने मोठ्या हालचाली सुरू झालेले आहेत. (Latest Marathi News)

भारत राष्ट्र समितीच्या पक्ष विस्ताराच्या दृष्टीने महाराष्ट्रात सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये आतापर्यंत राज्यातील विविध भागातील अनेक नेते बीआरएस मध्ये प्रवेश करत आहेत. त्यातच आषाढी वारीचं औचित्य सांधुन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांनी आपले सर्व मंत्रिमंडळ आणि पक्षाचे आमदार यांच्यासह आज (27 जुन) पंढरपूर गाठलेले आहे. त्यामुळेच त्याची चर्चा राज्यभर राजकीय वर्तुळात मोठी होताना दिसून येत आहे.

बीआरएस पक्ष वाढीसाठी महाराष्ट्रातील अशा नेत्यांच्या संपर्कात आहे की ज्यांना त्यांच्या पक्षातून कुठेतरी साईडलाईन केलेलं दिसत आहे. अशाच असंतुष्ट नेत्यांमध्ये एक सर्वात मोठे नाव म्हणून बीआरएसने भारतीय जनता पक्षातील मोठ्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे मोर्चा वळवल्याचं बोललं जातंय.

पंकजा मुंडे या वंजारी समाजातून येतात आणि त्या ओबीसी समाजाचे नेतृत्व करतात अशी त्यांनी राजकीय ओळख निर्माण केली आहे. राज्यातील विविध भागांमध्ये त्यांचा समर्थक असलेला वर्ग प्रचंड मोठा असून त्यांच्या एका सभेने अनेक उमेदवारांना आमदारकी प्राप्त झाल्याचं हे संबंधित आमदार आवर्जून सांगतात. मात्र पंकजा मुंडे याच सध्या कुठेतरी अडगळीत आहेत का अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात आहे, आणि त्यातूनच बीआरएस या पक्षांने ही गोष्ट हेरून त्यांना पक्षाच्या राज्यातील भावी मुख्यमंत्री पदाचा चेहरा या अर्थाने मोठी ऑफर दिल्याचं बोललं जात आहे.

बीआरएस पक्षाकडून जरी पंकजा मुंडे यांना भावी मुख्यमंत्री म्हणून मोठी ऑफर दिली गेलेली असली तरी याबद्दल खुद्द पंकजा मुंडे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आल्याचे दिसत नाही. मात्र एकूणच यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये काही चलबिचल झाल्याचं निश्चितच समोर येत आहे.

भारतीय जनता पक्षाचे खासदार सुजय विखे यांना याच अनुषंगाने विचारले असता, त्यांनी मात्र पंकजा मुंडे ह्या कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष सोडणार नाहीत, त्यांच्यामध्ये भाजपचा डीएनए आहे. त्या कधीही पक्ष सोडून जाणार नाही हा मला विश्वास आहे, असं खासदार सुजय विखे म्हणाले.

"पंकजा मुंडे हे एक मोठं सक्षम नेतृत्व आहे आणि अशा नेत्यांसाठी इतर पक्षांना नेहमीच हेवा वाटत असतो. अशा नेत्या आमच्या भाजप पक्षात आहे याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप खूप मोठी झालेली आहे. आणि पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पार्टी अजून बळकट होत आहे. त्यामुळे कुणाची काही ऑफर असली तरी पंकजा मुंडे ह्या भाजपच्याच आहेत, त्यांच्या डीएनए मध्ये भाजप आहे. मीडिया आणि बातम्यांमध्ये काही पसरवलं जात असले, तरी त्या भारतीय जनता पक्ष बळकट करण्यासाठी काम करत राहतील," असा मला विश्वास असल्याचे खासदार विखे यांनी यावेळी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT