Shivsena logo Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सुजय विखेंचा जवळचा कार्यकर्ता शंकरराव गडाख, औटी यांनी फोडला...

अहमदनगर जिल्हा परिषद व पारनेर पंचायत समिती निवडणुकांत शिवसेनेची ( Shivsena ) ताकद दाखविण्याची तयारी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी ( Vijay Auti ) यांनी केली आहे.

अमित आवारी

अहमदनगर - पारनेर नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली आहे. मात्र अहमदनगर जिल्हा परिषद व पारनेर पंचायत समिती निवडणुकांत शिवसेनेची ( Shivsena ) ताकद दाखविण्याची तयारी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी ( Vijay Auti ) यांनी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विखे पाटील कुटुंबाचे खंदे समर्थक समजले जाणारे अळकुटीचे ( ता. पारनेर ) डॉ. भास्करराव शिरोळे यांचा उद्या ( शनिवारी ) शिवसेनेत प्रवेश घडणार आहे. ( Sujay Vikhe's activist was taken over by Shankarrao Gadakh and Vijay Auti in Shiv Sena )

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पारनेरमध्ये घेतलेल्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या शिबिरात भाजपच्या नेत्यांपेक्षा शिवसेनेचेच नेते दिसले. आमदार नीलेश लंके यांच्या विरोधकांना खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे ताकद देत असल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रारीही केल्या. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.

विखे कुटुंबाचे समर्थक असलेले डॉ. शिरोळे हे उद्या ( शनिवारी ) राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मृदू व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख तसेच माजी आमदार विजय औटी यांच्या प्रमुख उपस्थितीत अळकुटी येथे जल्लोषात शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पक्ष प्रवेशामुळे अळकुटी परिसरात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. याचा फायदा शिवसेनेला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत होईल.

शिवसेनेची ताकद वाढली

पारनेर तालुक्यात शिवसेनेकडे माजी आमदार विजय औटी, जिल्हा परिषदेतील कृषी व बांधकाम विभागाचे माजी सभापती काशिनाथ दाते, विकास रोहकले, रामदास भोसले, संतोष साबळे आदींची मोठी फौज आहे. त्यामुळे तालुक्यातील उत्तर व पश्चिम भागात शिवसेनेची ताकद आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT