<div class="paragraphs"><p>Dr. Sujay Vikhe Patil discussed the issue with Shirdi Airport Minister Jyotiraditya Shinde</p></div>

Dr. Sujay Vikhe Patil discussed the issue with Shirdi Airport Minister Jyotiraditya Shinde

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

शिर्डी विमानतळ प्रश्नावर सुजय विखेंच्या प्रयत्नाला यश

सतीश वैजापूरकर

शिर्डी ( अहमदनगर ) : शिर्डी विमानतळावरील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी काल ( बुधवार ) खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे ( Jyotiraditya Shinde ) यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी शिर्डी विमानतळा विषयी महत्त्वाची आश्वासने दिली. Sujay Vikhe's attempt succeeds: DGCA's permission extended for four months

अडीच किलोमीटर अंतराची दृश्यमानता असताना शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीवर विमाने उतरविण्यास विमान महानिदेशालयातर्फे (डीजीसीए) देण्यात आलेल्या परवानगीस आणखी चार महिन्यांची मुदतवाढ देऊ, तसेच नाइट लँडिंगसह अन्य कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी डीजीसीएतर्फे तज्ज्ञांची मार्गदर्शक समिती नेमण्याबाबत सबंधितांसोबत चर्चा करू, असे आश्वासन ज्योतिरादित्य शिंदे यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना दिले.

या भेटीत डॉ. विखे पाटील यांनी शिर्डी विमानतळावरील विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. अडीच किलोमीटर दृश्यमानतेत विमाने उतरविण्यासाठी देण्यात आलेल्या परवान्याची मुदत येत्या 20 डिसेंबर रोजी संपणार होती. हा परवाना वेळेत मिळाला नसता, तर पुन्हा पाच किलोमीटर दृश्यमानता असतानाच विमानवाहतूक सुरू ठेवण्याची वेळ आली असती. सध्याच्या कमी दृश्यमानता असलेल्या वातावरणात ते शक्य झाले नसते. त्यामुळे विमान कंपन्यांवर पुन्हा गाशा गुंडाळण्याची वेळ आली असती. अशी आणीबाणीची परिस्थिती पुन्हा उद्‌भवू नये, यासाठी खासदार डॉ. विखे पाटील यांनी ही भेट घेतली.

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, की या विमानतळावरील नाइट लँडिंगचे काम वेळेत व अचूक होणे गरजेचे आहे. धावपट्टीच्या कडेचे एज मार्किंग व पॅपिलाइटच्या आधारे कमी दृश्यमानता असताना विमान उतरविणे शक्य होते. या विमानतळाला कार्गो सेवेची मान्यता मिळाली. त्यासाठी स्वतंत्र कार्गो टर्मिनलची उभारणी गरजेची आहे. त्यासाठी विमान महानिदेशालयाने तज्ज्ञांची समिती नेमावी. या समितीच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत.

त्यावर मंत्री शिंदे म्हणाले, की परवान्यास लगेचच मुदतवाढ देतो आहे. तज्ज्ञांच्या समितीबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेऊ. या विमानतळावरील समस्या मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू.

प्रवासी, विमान कंपन्यांनाही भुर्दंड

हिवाळा आणि पावसाळा हा कमी दृश्यमानतेचा काळ असतो. शिर्डी विमानतळावर नाइट लँडिंग सुविधा अद्याप सुरू झाली नाही. त्यामुळे धुके आणि खराब हवामान असताना येथे उतरणारी विमाने औरंगाबाद किंवा मुंबई विमानतळावर उतरविण्याची वेळ येते. प्रवासी आणि विमान कंपन्यांना यामुळे भुर्दंड बसतो. विमानतळावरील हवाई सेवेच्या विस्ताराला खीळ बसते. या अडचणी मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पंधरा दिवसांत सलग दुसऱ्यांदा हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT