Sunetra Pawar | Supriya Sule | Preetisangam Visit Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Politics : यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकत्र; राजकीय चर्चांना उधाण

Yashwantrao Chavan death anniversary : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीनंतर पवार कुटुंबातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. एकीकडे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय वाटचाल, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची स्वतंत्र राजकीय भूमिका, असे चित्र राज्याच्या राजकारणात आहे.

हेमंत पवार - Hemant Pawar

Karad News, 25 Nov : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या दोघीही दाखल झाल्या. विशेष म्हणजे, दोघींचे आगमन टप्प्याटप्प्याने झाले असले, तरी काही काळ त्यांनी एकत्रित भजन कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यामुळे प्रीतिसंगमावरील या भेटीची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा रंगली.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीनंतर पवार कुटुंबातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. एकीकडे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय वाटचाल, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची स्वतंत्र राजकीय भूमिका, असे चित्र राज्याच्या राजकारणात आहे.

या दोन राजकीय प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची एकाच दिवशी प्रीतिसंगमावर झालेली उपस्थिती त्यामुळे लक्षवेधी ठरली. दोघीही समाधीस्थळी अभिवादनासाठी वेगवेगळ्या वेळी दाखल झाल्या. मात्र, त्यानंतर काही काळ एकत्रित भजन कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना वेगळे वळण मिळाले.

राजकीय मतभेद आणि कौटुंबिक नाती या दोन वेगळ्या बाबी असल्याचा संदेश या उपस्थितीतून जात असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. अर्थात, या भेटीमागे कोणताही राजकीय संदेश होता का, याबाबत दोघींकडून अधिकृत भूमिका व्यक्त करण्यात आलेली नाही.

दरम्यान, यावेळी मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार हर्षदा देशमुख जाधव, आमदार प्रताप पाटील, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष एडवोकेट उदयसिंह पाटील उंडाळकर, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT