Omraje Nimbalkar: ठाकरेंना सोडलं, शिंदेंना जवळ केलं, गद्दारीचा शिक्का, तरी ओमराजे निंबाळकर म्हणतात, २०२९ ची लोकसभा निवडणूक....

Dharashiv Loksabha Election : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांची साथ सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे गद्दारीचा शिक्का बसलेले धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विरोधकांना चॅलेंज दिले आहे.
Uddhav Thackeray, Omraje Nimbalkar Eknath Shinde
Uddhav Thackeray, Omraje Nimbalkar Eknath Shindesarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांची साथ सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे गद्दारीचा शिक्का बसलेले धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विरोधकांना चॅलेंज दिले आहे. २०२४ मध्ये मिळालेल्या मताधिक्यापेक्षा एक अधिकचे मत घेऊन निवडून आल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच त्यांनी विरोधकांना दिला. चोवीस तास मी जनतेसाठी उपलब्ध आहे, इथे उपस्थित एकाने मला सांगावे, की मी ओमराजेंना फोन केला आणि त्यांनी तो उचलला नाही, मी आता राजकारण सोडून इथून निघून जाईल, असे सांगत ओमराजे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपली भूमिका मांडली.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत धाराशीवमध्ये ओम राजेनिंबाळकर यांनी तरुणांसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. पुढील अडीच-तीन वर्ष कुठलीही निवडणूक नाही. नाही तर काही नेते निवडणुका असल्या की बेरोजगारांचे मेळावे, नोकरीसाठीचे मेळावे घेत असतात. पण आता कुठलीही निवडणूक नाही, पण दुष्काळात घरातील तरूणाच्या हाताला काम मिळाले, नोकरी मिळाली तर तो आपल्या बापाला, कुटुंबाला आधार देऊ शकतो. या हेतूने हा नोकरी मेळावा आयोजित केला असल्याचे ओमराजे यांनी स्पष्ट केले.

आम्हाला नुसती एमआयडीसी नको, तर तिथे प्रत्यक्ष उद्योग उभे राहून माझ्या जिल्ह्यातील तरूणाच्या हाताला इथेच काम मिळाले पाहिजे, पुढच्या वर्षी तुम्ही जेव्हा याला तेव्हा धाराशीवच्या तरूणाला इथल्याच एमआयडीसीतील उद्योगामध्ये नोकरी मिळालेली असेल हे चित्र मला पहायचे आहे. १९७२ मध्ये दुष्काळ पडला तेव्हा मुलांनी आपल्या बापाकडे खायला मागितले तर तो देऊ शकत नव्हता अशी परिस्थिती होती. आताही पीकं करपून, वाळून गेली आहे. शेतकऱ्याच्या हाताला काहीच आलेले नाही. अशा वेळी घरातील तरूण पोरगा जर हाताशी आला, दोन पैसे कमावू लागला, तर हे कुटुंब तरू शकेल.

चोवीस तास संपर्क कार्यालय..

ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवकरांसीठी आपण चोवीस तास संपर्क कार्यालयाचे लोकार्पण करत असल्याचे जाहीर केले. विरोधकांना आजच आपण चॅलेंज देत आहोत, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत गेल्यावेळी मिळालेल्या ३ लाख २९ हजार ८४६ मताधिक्यापेक्षा एक अधिकचे मत घेऊन निवडून येईल. हे चॅलेंज मी जाहीरपणे, तुमचा माझ्यावर असलेल्या विश्वासावर देत आहे, असे सांगत ओमराजे यांनी विरोधकांना आताच आव्हान दिले.

Uddhav Thackeray, Omraje Nimbalkar Eknath Shinde
BJP Akali Dal Alliance : ज्या भाजपला 'शीख संस्थांवर कब्जा करणारा' म्हणाले, त्याच भाजपच्या चरणी बादल कुटुंब! भगवंत मान यांचा घणाघात

ओमराजे निंबाळकर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत १ लाख २७ हजार ५६६ मतांनी विजय मिळवला होता. तर २०२४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या अर्चना पाटील यांचा ३ लाख २९ हजार ८४६ मतांनी पराभव केला. २०१९ मध्ये शिवसेनेने ओमराजे निंबाळकर यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राणाजगजितसिंह पाटील निवडणूक लढवत होते.

ओमराजे निंबाळकर यांना तेव्हा ५,९६,६४० तर राणाजगजितसिंह पाटील यांना ४,६९,०७४ मते मिळाली होती. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांना ७,४८,७५२ तर राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांना ४,१८,९०६ मते मिळाली. ओमराजे यांनी ३,२९,८४६ मतांच्या फरकाने अर्चना पाटील यांचा पराभव केला होता.

Uddhav Thackeray, Omraje Nimbalkar Eknath Shinde
Dattatray Bharne : 'नमो शेतकरी योजना आणि अग्रीम रक्कम एकच', गोंधळानंतर कृषी मंत्री दत्ता भरणेंची सारवासारव; म्हणाले, फाईल पाठवलीय...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Maharashtra Live Politics Update
chandrashekhar bawankule, balvant wankhede
Satara Dcc Bank Result
Ranjitsinh Naik Nimbalkar Ramraje Naik Nimbalkar