mahesh shinde-shambhuraj desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Politic's : शंभूराज देसाईंनी कोरेगावात डाव टाकला; आमदार महेश शिंदे समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश, राजाभाऊ बर्गेंना पाठबळ...

MLA Mahesh Shinde Supporters Join Shivsena : कोरेगाव मतदारसंघात आमदार महेश शिंदे यांच्या शेकडो समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माजी नगराध्यक्ष राजभाऊ बर्गे यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली.

ओंकार कदम

Satara, 29 November : कोरेगाव विधानसभा मतदार संघात मोठी राजकीय घडामोड घडली असून सातारा जिल्हा परिषद निवडणुकीपासून भाजपसोबत गेलेले शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जोरधार धक्का दिला आहे. आमदार शिंदे यांच्या शेकडो कट्टर समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच, माजी नगराध्यक्ष राजभाऊ बर्गे यांच्या पाठीशी उभा राहण्याची ग्वाहीही पालकमंत्री देसाई यांनी दिली आहे. त्यामुळे आमदार शिंदे यांना विधानसभेला बर्गे यांच्या रुपाने पर्याय उभा करण्याचा जोरदार डाव देसाई यांनी टाकला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीपासून आमदार महेश शिंदे आणि शिवसेनेत अंतर पडत गेले आहे. शिवसेना आमदार शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना भाजपने जिल्हा परिषद अध्यक्षपद देऊ केले आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्यांना आमदार शिंदे यांनी भाजपसोबत नेले होते.

दुसरीकडे, अध्यक्षपद निवडणुकीच्या वेळी देसाई यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती, त्यामुळे पालकमंंत्री शंभूराज देसाई हे कमालीचे दुखावले आहेत. तेव्हापासून आमदार शिंदे आणि शिवसेना पर्यायाने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यात मतभेद आहेत. त्यातून देसाई यांनी आमदार शिंदे यांना पर्याय म्हणून राजाभाऊ बर्गे यांना सर्वपरीने ताकद देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने हा पक्ष प्रवेश सोहळा झाल्याचे मानले जात आहे.

आमदार महेश शिंदेंचे निकटवर्ती आकाश साबळे आणि पहिलवान सचिन शेलार आणि माजी नगरसेवक दीपक फडतरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

कोरेगाव नगरपंचायतीवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना नेते राजाभाऊ बर्गे यांना सर्वांनी साथ द्यावी. बर्गे यांच्या पाठीशी भावासारखा खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाहीही शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

कोरेगाव मतदारसंघात आमदार महेश शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शिवथर येथील आकाश साबळे आणि पहिलवान सचिन शेलार यांनी शेकडो समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शिवसेना नेते राजाभाऊ बर्गे यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

या घडामोडीमुळे कोरेगावच्या स्थानिक राजकारणात आमदार महेश शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी कोरेगाव येथील शिवसेना नेते राजाभाऊ बर्गे यांच्या पाठीशी आपण भावासारखे खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही दिली आहे.

कोणतेही पद न मागता जनतेच्या कामांसाठी धडपडणाऱ्या राजाभाऊंना कोरेगावकरांनी भक्कम साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, आगामी कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्डावॉर्डात संघटन मजबूत करून नगरपालिकेवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन पालकमंत्री देसाई यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT