Solapur Drought Relief : दुष्काळी उपायांसाठी पालकमंत्री कार्यालयात ‘वॉररुम’: 48 तासांत टॅंकर; माणसी 5 किलो धान्य मोफत, 8 दिवसांत उर्वरीत शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम...

Guardian Minister Jaykumar Gore Announcement : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यात मागणीनंतर 48 तासांत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले. दुष्काळी वॉररूम, हेल्पलाईन आणि शिधापत्रिकाधारकांना पाच किलो मोफत धान्याची घोषणा केली.
Jaykumar Gore
Jaykumar Gore Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 28 November : सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही गावांत मागणीनंतर 48 तासांत टँकर मंजुरीसह पाणी पोहोचले पाहिजे. केवळ मंजुरी दिली म्हणजे काम संपले असे नव्हे; तर गावात पाणी पोहोचवण्याची जबाबदारी प्रांताधिकाऱ्यांची आहे. दुष्काळी उपाय योजनांसाठी पालकमंत्री कार्यालयात ‘वॉररूम’ सुरु केली असून त्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून दिला आहे. तसेच, शिधापत्रिकाधारकांना माणसी 5 किलो धान्य मोफत दिले जाणार आहे, अशी घोषणा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री गोरे बोलत होते. या वेळी आमदार, खासदार आणि अधिकारी उपस्थित होते. सध्या 4 लाख 10 हजार लोकांना मोफत धान्य मिळते. या महिन्यांपासून सर्व शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळेल. कर्जाची आणि व्याजाची सक्तीने वसुली करता येणार नाही. खासगी सावकाराला देखील कर्ज आणि व्याज वसूल करता येणार नाही. खासगी सावकारांवर आधी गुन्हा दाखल करा आणि मग खातरजमा करा, असा आदेशही गोरे यांनी दिला.

ते म्हणाले, पालकमंत्री ऑफिसची वॉररूम सुरु केली आहे, त्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून दिला आहे. माणसी 2 किलाे तांदूळ, 3 किलो गहू शिधापत्रिकाधारक नागरिकांना मोफत देण्यात येणार आहे. राज्यातला किंवा परराज्यातील असला तरी त्याला रेशनधान्य देण्यात येणार आहे.

बिहारी किंवा इतर राज्यांतून आलेले नागरिक हे देशाचे नागरिक आहेत. मात्र जे देशाबाहेरील बेकायदेशीरपणे आलेले आहेत, त्यांना धान्य मिळणार नाही. तसेच, माझा जन्मच दुष्काळात झालाय, त्यामुळे मला सगळे माहिती आहे. दुष्काळाचा फायदा कोण कसा घेतो, त्याबाबत मला माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात चुकीचे काम होऊ देणार नाही, असा इशाराही गोरे यांनी दिला.

Jaykumar Gore
Delimitation Bill : काँग्रेसच्या बड्या नेत्याची भूमिका : ‘डिलिमिटेशन व्हायलाच पाहिजे; पण....’

गोरे म्हणाले, एनटीपीसीने रिसायकल केलेले पाणी वापरावे लागेल. त्यांनी तसे न केल्यास वेळ पडली तर त्यांना सक्ती केली जाईल. दुष्काळाची अग्रीम मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांना येत्या 8 दिवसांत पैसे मिळणार आहेत.

Jaykumar Gore
Solapur Dcc Bank Result : मोहिते पाटलांनी टाकलेला डाव गोरेंनी मतदानाच्या आदल्या दिवशी उधळला; राऊत, कल्याणशेट्टी, परिचारकांची खंबीर साथ!

कर्नाटकाच्या पाणी मागणीवरही गोरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, उजनी धारणातून पाण्याचे वाटप झालेले आहे. आपली तहान भागवून आपण दुसऱ्याला पाणी दिलं पाहिजे. पण आपलीच तहान भागली जात नसेल तर दुसऱ्यांना पाणी कसे देणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.