Supriya Sule Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Supriya Sule: 'फडणवीसांनी गोपनीयतेचा भंग, केला' सुप्रिया सुळे यांनी भाजपला घेरलं....

Supriya Sule Press Conference : गोपनीयतेचा भंग शिवाय गद्दारांना जवळ करणाऱ्यांवर गुन्हा नोंद झाला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली.

Rahul Gadkar

Kolhapur News : भारतीय जनता पक्षाने ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले ते आज सगळे भाजपमध्ये आहेत. 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर आहेत त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सही करून कशी दाखवली गेली. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या सगळ्या लोकांना फसवलं आहे.

फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे, त्यांना उत्तर द्यावं लागेल. ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्या संदर्भातील फाईल विरोधकांना कशी काय दाखवली जाते. त्यांनी गोपनीयतेचा भंग केला आहे. शिवाय गद्दारांना जवळ केले आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली.

मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतील माघार घेतल्यानंतर त्याबाबत सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. 'लोकशाहीमध्ये सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. कुणावर दडपशाही करता येत नाही. असे सांगत संविधानाबाबत बोलताना, दडपशाही करणारी अदृश्य शक्ती दिल्लीत बसली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला जो विरोध करेल त्याला आम्ही कडाडून विरोध करू. सशक्त लोकशाहीत सर्वांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे', असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

निवडणुकीत सगळ्यांना मतं मागण्याचा अधिकार आहे. तसे दादा त्यांच्यासाठी मतं मागत असतील. मात्र बारामतीची जनता ठरवेल कुणाला मत द्यायचं. राज्याचा मुख्यमंत्री हा महिला होऊ दे किंवा पुरुष होऊ दे. पण राज्याला पुढे घेऊन जाणारा मुख्यमंत्री असला पाहिजे. महिला आरक्षण बिल या अधिवेशनात येईल असं वाटलं होतं पण तसं झालं नाही. पण येणाऱ्या अधिवेशनात हे बिल पास होईल असं वाटतं.

अरविंद सावंत यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल तातडीने माफी मागितली. पण सत्तेतील लोक महिलांचा वारंवार अवमान करत आहेत. मात्र त्याठिकाणी कुणी माफी मागितली नाही. जयश्री थोरात यांच्याबद्दल बोलल्यावर कुणी माफी मागितली का? हे सगळं घडत असताना मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. अशा पद्धतीची निवडणूक मी पहिल्यांदाच पाहत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

हसन मुश्रीफ यांच्यावर अदृश्य शक्तीने काय जादू केली काही माहीत नाही. मुश्रीफ यांनी कोणती गुरूदक्षिणा दिली? माझा मुश्रीफ यांना सवाल आहे कोणती गुरुदक्षिणा दिली ते सांगावं, असा टोला सुळे यांनी मुश्रीफ यांना हाणला. समरजीत घाटगे (Samarjit Ghatage) यांच्यावर माझं खूप वर्षांपासून लक्ष होतं. त्यांना मी नेहमी म्हणायचे की इकडे या. भाजपला त्यांचं टॅलेंट महत्त्वाचं वाटलं नाही. आता ते कागलचे आमदार होतील. असेही सुप्रिया सुळे म्हणाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT