Supriya Sule On Sunetra Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Supriya Sule : 'सुनेत्रा पवार गेल्या 'त्या' कार्यक्रमाचं मलाही निमंत्रण, मात्र...'; सुप्रिया सुळेंनी सांगितली वेगळीच स्टोरी

Supriya Sule On Sunetra Pawar Presence RSS Event : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी तथा राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार या संघाच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. ज्यानंतर राज्यात जोरदार चर्चा झाली होती.

Sudesh Mitkar

Summary :

  1. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार RSS च्या एका कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

  2. यानंतर सुप्रिया सुळे यांनी दावा केला की, कंगना रणौत यांनी त्यांनाही या कार्यक्रमाला आमंत्रण दिलं होतं.

  3. या उघडकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात नवी खळबळ उडाली आहे.

Pune Newe : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यावरून राज्यात जोरदार चर्चा झाल्या होत्या. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याच कार्यक्रमाबद्दल वेगळा दावा केला आहे. त्यांनी, भाजप खासदार कंगना रानौत यांनी आपल्यालाही याचे आमंत्रण दिले होते, असा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे पुन्हा नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

काय आहे प्रकरण ?

भाजप खासदार कंगना रानौत यांच्या दिल्लीतील घरी सुनेत्रा पवार यांनी भेट दिली होती. या भेटीचे फोटो कंगना राणावत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या फोटोमध्ये काही महिला खाली बसल्या होत्या, समोर गुरु बसले होते आणि त्यांच्या शेजारी केशव बळीराम हेडगेवार आणि माधवराव सदाशिवराव गोळवलकर यांचे फोटो दिसत होते. या फोटोच्या आधारे सुनेत्रा पवार यांनी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याचा दावा विरोधकांनी केला होता.

यावर सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. सुनेत्रा पवार यांनी, "राष्ट्र सेवा समिती संघाची बैठक आहे किंवा संघाच्या अनुषंगाने कार्यक्रम आहे, याची माहिती नव्हती. स्नेहमिलनासाठी बोलावलं होतं, त्यामुळे शुभेच्छा भेटीसाठी मी गेले होते, असे सांगितले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वर्धा इथे बोलताना यावर भाष्य केले. ते म्हणाले, "मला माहिती नाही, मी आता माहिती घेतो. पण माझी बायको कुठे जाते याची मिनिट टू मिनिट माहिती घेत नाही", असे त्यांनी सांगितले.

या प्रकरणावर आता सुप्रिया सुळे यांनी देखील भाष्य केलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, सुनेत्रा वहिनींनी कुठे जायचं आणि कुठे नाही ते त्यांनी ठरवावं. ही लोकशाही आहे, त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. त्या कार्यक्रमाला मलाही कंगना रानौत यांनी बोलावलं होतं. त्यांनी मला सांगितलं की, हा संघाचा इनरोलमेनचा कार्यक्रम आहे.

त्यावर मी विनम्रपणे त्यांना सांगितलं की, संघाच्या सभासद नोंदीच्या कार्यक्रमाला मला येणे जमणार नाही. कारण सभासद नोंदणी म्हणजे मेंबर होणं आणि अशा कार्यक्रमाला मी कशी जाणार? कंगना रानौत आणि माझे वैयक्तिक असे खूप चांगले संबंध आहेत. मात्र आमच्या विचारधारा वेगळ्या आहेत असेही पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

FAQs :

प्रश्न 1: सुनेत्रा पवार कुठे दिसल्या?
उत्तर: त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

प्रश्न 2: सुप्रिया सुळे यांनी काय दावा केला?
उत्तर: भाजप खासदार कंगना रणौत यांनी त्यांनाही त्या कार्यक्रमाला बोलावलं होतं, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

प्रश्न 3: याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम झाला?
उत्तर: यामुळे पुन्हा एकदा राज्यात नवे वाद आणि चर्चेला सुरुवात झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT