Supriya Sule Emotional statement : पुणे "माझा भाऊ आज नाही, भावाच्या व माझ्यामध्ये जे काही बोलणे झाले, ते आम्हा बहिण-भावालाच माहिती. आता ते खरे-खोटे करून काय उपयोग ? आता उणीदुणी काढण्यात अर्थ नाही. आता कामाला लागणे हीच दादांना सर्वात मोठी श्रद्धांजली ठरेल.' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विलीनीकरणावर सूचक विधान केले. तर, विलीनीकरणामध्ये प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे आडकाठी आणत आहे का ? ' या प्रश्नावर बोलण्याचे टाळले.
पुणे महापालिकेतील तसेच बारामती मतदारसंघामधील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी खासदार सुळे या बुधवारी महापालिकेमध्ये आल्या होत्या. त्यानंतर, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूबाबत रोहित पवार यांच्याकडून पत्रकार परिषद घेत आवाज उठविला जात आहे. त्याबाबत सुळे म्हणाल्या, "दादा रोहित पवारचे काका होते, त्यामुळे रोहित अस्वस्थ असणे स्वाभाविक आहे.
रोहित पवार हे अजित दादांच्या अपघाती मृत्यूचा अभ्यासपूर्वक पाठपुरावा करत आहेत. त्यामध्ये तथ्य आहे, म्हणूनच आम्हीही पारदर्शकपणे चौकशी व्हावी व डेटाची मागणी करत आहोत. आमच्या घरातील कर्ता पुरुष गेला आहे, ते दुःख आयुष्यभर मनात राहील. आमच्या घरात झाले, ते कोणाच्याही वाट्याला येऊ नये. आम्ही दादा पाहू शकलो नाही. त्यामुळे सत्य पुढे आले पाहीजे, हीच आमची मागणी आहे.'
सुळे म्हणाल्या, "महापालिका निवडणुकांच्यावेळी आम्ही सगळे एकत्र लढलो, आम्ही तथ्यावर आधारीत राजकारण करतो. आपल्या पदरात काय पडेल, यासाठी आम्ही कधीच राजकारण केले नाही. विश्वासाच्या नात्यांनी लोकांनी निवडून दिले, लोकांची कामे व्हावीत, त्यांची कामे व्हावीत, यावरच आमचा भर आहे. त्यामुळे महापालिकेमध्ये दोन्ही पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी एकत्र काम करतील.'
- राज्यसभेच्या जागेबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरु आहे
- शरद पवार यांना राज्यसभेवर पाठविण्यासंदर्भात महाविकास आघाडीच निर्णय घेईल
- अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात कॉंग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संसदेत चर्चा केली
- विमानातील ब्लॅकबॉक्समधील माहिती नक्कीच उपलब्ध होऊ शकेल
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.