Pune PMC : पुणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बिगर राजकीय व्यक्तीचा स्वीकृतसाठी अर्ज : महाराष्ट्र सरकारच्या अध्यादेशाचा घेतला आधार

Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी बिगर राजकीय व्यक्तीने स्वतंत्र अर्ज दाखल केला. नव्या अध्यादेशाच्या पार्श्वभूमीवर या अर्जाकडे प्रशासन आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Applicant submits independent application for Accepted Corporator post at Pune Municipal Corporation office amid ongoing political selection process.
Applicant submits independent application for Accepted Corporator post at Pune Municipal Corporation office amid ongoing political selection process.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : भिवंडी वगळता महाराष्ट्रातील सगळ्या महापालिकांमध्ये महापौर, उपमहापौर, गटनेता, विरोधी पक्षनेता निवडीच्या औपचारिक प्रक्रिया पार पडल्या आहेत. यानंतर फिल्डिंग लागली आहे ती स्वीकृत नगसेवक होण्यासाठीची. अनेक कार्यकर्त्यांना निवडणूक काळामध्ये उमेदवारी मिळू शकली नव्हती. आता या कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून पक्ष आपल्याला संधी देईल अशी अपेक्षा आहे.

पुणे महापालिका निवडणुकीमध्ये मध्ये भाजपची एकहाती सत्ता आली आहे. भाजपचे 165 जागांपैकी 119 जागांवर नगरसेवक निवडून आले आहेत. या संख्याबळानुसार भाजपाकडून 7 स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. यापूर्वीच भाजपाचे नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 2 टप्प्यांमध्ये स्वीकृत नगरसेवक पद दिले जाणार असून 14 कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी मिळणार असल्याचे सांगितले आहे.

तसेच जे निवडणुकीमध्ये पराभूत झालेत अशांना पुन्हा स्वीकृत म्हणून संधी देण्यात येणार नाही असं देखील स्पष्ट केले. तरी देखील अनेकांनी आपल्या पदरात स्वीकृत नगरसेवक पद पडावं यासाठी जोरदार फिल्डिंग लावली असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप बरोबरच काँग्रेसला 1 स्वीकृत निवडता येणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 2 स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहेत. या पदासाठी जोरदार फील्डिंग सुरू आहे.

दुसरीकडे बिगर राजकीय इच्छुकांनीही महापालिका स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केल्याची घटना घडली आहे. पुणे महापालिकेच्या इतिहासात अशा प्रकारचा पहिल्यांदाच अर्ज आला आहे. राज्य सरकारने नवीन अध्यादेश जारी केला आहे. त्याचा आधार घेऊन ॲड प्रियांका पिसे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे स्वतंत्र अर्ज दाखल केला केला असल्यास समोर आलं आहे.

Applicant submits independent application for Accepted Corporator post at Pune Municipal Corporation office amid ongoing political selection process.
Pune BJP Congress Rada: काँग्रेस भवन दगडफेक: भाजपचे घाटे, काँग्रेसचे शिंदे यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

पक्षविरहित, पक्षाच्या शिफारशीचे पत्र न घेता दाखल करण्यात आलेला हा पहिला अर्ज ठरला आहे. मुळात सामाजिक संस्था, संघटना यांच्या माध्यमातून समाज हिताचं काम करणाऱ्या तसेच समाजामध्ये प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या डॉक्टर, वकील, यांच्यासह महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या आणि त्या जबाबदारीतून सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्याबाबत महापालिका अधिनियमामध्ये तरतूद करण्यात आली आहे.

Applicant submits independent application for Accepted Corporator post at Pune Municipal Corporation office amid ongoing political selection process.
Pune Congress Bhavan: महापौर मंजुषा नागपुरेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेस हायकोर्टात जाणार; पहिला दगड कोणी भिरकावला? याचाही फैसला तिथंच होणार

मात्र बहुतांश वेळा या पैकी कोणत्याही व्यक्तीला संधी न देता पक्षातीलच कार्यकर्त्यांचा पुनर्वसन करण्यासाठी स्वीकृत नगरसेवक वापरले जातात. राजकीय पक्षाकडून ही भूमिका गेल्या काही वर्षापासून घेतली जात असल्याचा पाहायला मिळत आहे. अशातच आता अशा प्रकारे बिगर राजकीय व्यक्ती या पदासाठी अर्ज करणारा असेल तर त्यावरती प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com