NCP merger discussion : विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते; रोहित पवारांच्या दाव्यावर दिली त्यांनी मोठी कबुली, म्हणाले...

Rohit Pawar claim News : राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी साम टीव्हीला दिलेल्या 'ब्लॅक अँड व्हाईट' मुलाखतीमध्ये या बाबत मोठे विधान केले आहे.
Amol Kolhe, Ajit Pawar
Amol Kolhe, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून चर्चा रंगल्या आहेत. त्यातच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे हे प्रदेशाध्यक्ष होणार होते, असे विधान रोहित पवार यांनी केले आहे. त्यानंतर या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी साम टीव्हीला दिलेल्या 'ब्लॅक अँड व्हाईट' मुलाखतीमध्ये या बाबत मोठे विधान केले आहे.

आमदार रोहित पवार यांनी केलेल्या या दाव्यावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, 'या सगळ्या गोष्टींवर मी आधीपण बोललो आहे. जे काही ठरले होते ते आता पब्लिक डोमेनवर बऱ्यापैकी आले आहे. रोहित पवारांनी सांगितलेली गोष्ट या आधी देखील पब्लिक डोमेनमध्ये आलेली आहे. या बाबत चर्चा झाल्या होत्या ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Amol Kolhe, Ajit Pawar
ncp bjp alliance : सुनील तटकरे-रवींद्र चव्हाणांची भेट : रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर ZP ची समीकरण बदलणार? राष्ट्रवादी भाजपला सत्तेत बसवणार?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्या होत्या. मी अगदी ठामपण सांगतो कारण मला आठवतंय 16 मेला बारामती ते पुणे हा प्रवास माझा दादांसोबत झाला होता. 16 मेपासून मी या प्रोसेसमध्ये आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रचारसभा संपवून अजितदादा आणि मी सोबत प्रवास केला होता, असेही यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.

Amol Kolhe, Ajit Pawar
Sunetra Pawar NCP President : ‘तो’ दिवस ठरला! सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर : प्रफुल पटेलांनी सांगितली नेमकी तारीख

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात हे जे काही टप्पे घडले आहेत. त्यामध्ये नेतेमंडळीमध्ये एकूण 14 बैठका झाल्या आहेत. यातील 11 बैठका जयंत पाटील यांच्या घरी झाल्या होत्या. याबाबत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील सांगितले आहे. ही सगळी वस्तुस्थिती असल्याचे कोल्हे म्हणाले.

Amol Kolhe, Ajit Pawar
ncp bjp alliance : सुनील तटकरे-रवींद्र चव्हाणांची भेट : रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर ZP ची समीकरण बदलणार? राष्ट्रवादी भाजपला सत्तेत बसवणार?

यामध्ये महत्वाची गोष्ट ही की, याबाबत आमच्या नेत्या सु्प्रिया सुळे यांनी देखील सांगितले की, ज्यांच्यासोबत चर्चा केली दुर्दैवाने ते आज आपल्यामध्ये नाहीत. काय चर्चा झाली होती?, कशासाठी चर्चा झाली होती? यासर्व गोष्टींविषयी बोलणं काही हशिल वाटत नाही, असेही अमोल कोल्हे म्हणाले.

Amol Kolhe, Ajit Pawar
Shivsena UBT Politics: एक हाती सत्ता काबीज करणाऱ्या भाजपला ठाकरेंचा शिलेदार घाम फोडणार, सत्ताधाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास शिवसेनेनं लावली फिल्डिंग!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com