Sunetra Pawar | Supriya Sule | Preetisangam Visit Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला प्रीतिसंगमावर स्नेहाची किनार, राजकीय दुरावा विसरून नेते एकत्र; सुप्रिया सुळेंकडून सुनेत्रा पवारांचे स्वागत

Supriya Sule Meets Sunetra Pawar in Karad : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिवादन केले.

सरकारनामा ब्युरो

Satara News : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर अभिवादनासाठी आलेल्या खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज समोरासमोर आल्या. त्यावेळी दोघांनी एकमेकींचे केलेले स्वागत चर्चेचे ठरले. खासदार सुळे यांनी हात जोडून सुनेत्रा पवार यांचे केलेले स्वागत, दोघींनी एकत्र बसून भजनाच्या ठिकाणी साधलेला संवाद आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे झालेले एकत्रित फोटोसेशन आदींनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

राजकीय अंतराच्या पार्श्वभूमीवर दिसलेल्या दोघींमध्ये दिसलेल्या या स्नेहपूर्ण क्षणांनी राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेलाही नवा संदर्भ मिळणार का? अशी चर्चाही समाधी परिसरात होती. ज्येष्‍ठ नेते (स्व.) चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सकाळी प्रीतिसंगमावर विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अभिवादनासाठी दाखल झाले होते.

त्यावेळी खासदार सुळे यांनी चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर काही क्षणातच उपमुख्यमंत्री पवार यांचे आगमन झाले. अभिवादनानंतर त्या पर्णकुटीसमोर भजन सुरू असलेल्या ठिकाणी गेल्या. तेथे खासदार सुळे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचे दिसता क्षणी हात जोडून स्वागत केले. दोघींनीही काही वेळ एकत्र बसून संवाद साधला. त्या भेटीत औपचारिकतेपेक्षा आपुलकीचा भाव अधिक जाणवत होता.

भेटीचे राजकीय महत्त्व वाढवणारा आणखी एक प्रसंग म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकत्रित छायात्रिकरण. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून खासदार सुळे, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार हर्षदा देशमुख, आमदार प्रतापसिंह पाटील यांच्यासह मान्यवर तर, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उपमुख्यमंत्री पवार, मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, बाळासाहेब सोळसकर यांनी उपस्थिती लावली. दोन्ही गटांतील नेते एकाच छायाचित्रात दिसल्याने या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.

काही क्षणांचा विलंब...

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी खासदार सुळे व उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वतंत्रपणे अभिवादन केले. त्यांच्या एकत्रित अभिवादनासाठी काही क्षणांची विलंब झाला. अभिवादनानंतर दोघीही पर्णकुटी समोर सुरू असलेल्या भजनाच्या ठिकाणी एकत्रीत बसल्या. तेथेच त्यांच्यात चर्चा अन् फोटोसेशनही झाले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT