

NCP Sharad Pawar Support Delimitation Bill : लोकसभा मतदारसंघांची फेररचना विधेयकाला अटी-शर्तीवर केंद्रातील भाजप मोदी सरकारला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि द्रमुक पाठिंबा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहेत. शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अटी-शर्तीचा उल्लेख करत, पाठिंब्याबाबत विचार केला जाऊ शकतो, असे संकेत दिले आहेत.
हाच धागा पकडत केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी शरद पवार राष्ट्रवादीकडे अधिकची चाचपणी करू लागले आहे. यातूनच खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी यावर भाष्य करताना, लोकसभा मतदारसंघांच्या फेररचना विधेयकाबाबत पडद्याआड सुरू असलेल्या घडामोडींवर सूचक असे भाष्य केले आहे.
शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी, "कोण काय म्हणतेय, हे मला माहिती नाही. सुप्रियाताई (Supriya Sule) आताच आल्या होत्या. त्या आमच्या ताई आहेत, त्यांना मंत्रिपद मिळाले, तर नक्कीच मला आनंद होईल," असे म्हणून शरद पवार राष्ट्रवादीभोवती सुरू असलेल्या राजकीय चर्चांमध्ये अधिकचा मंत्रिपदाचा रंग भरला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे (Shivsena UBT) खासदार संजय राऊत यांनी, लोकसभा मतदारसंघ फेररचना विधेयकाला पाठिंबा मिळावा, यासाठी भाजप सर्वच राजकीय डाव टाकत आहे. संपूर्ण पक्ष फोडता आला नाही, तर त्या पक्षांमधील वैयक्तिक खासदारांना विकत घेतले जाईल, असे सांगताना 'भाजप (BJP) नॅशनल स्टॉक एक्स्चेंज'मध्ये एका खासदाराची किंमत 150 कोटी रुपये आहे, असा आरोप केला आहे. तसेच फोडलेल्या खासदाराला पैसे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रातील बड्या नेत्यावर जबाबदारी दिल्याचा गौप्यस्फोटही राऊतांनी केलाय.
खासदार नरेश म्हस्के यांनी, खासदार राऊतांच्या या दाव्यावर बोलताना, लोकसभा मतदारसंघ फेररचना विधेयक हे पासच होणार आहे. विरोधाला विरोध करण्यासाठी त्यांची ही भूमिका आहे. विरोधी पक्षाचे खासदार या बिलाला सपोर्ट करणार, हे त्यांनाही माहिती आहे. म्हणून त्या खासदारांवर टीका करायची आणि त्यांच्यावर आरोप करायचे, यासाठी ते असे आरोप करत आहेत. असा आरोप केल्यामुळे हे गृहीत आहे की, शंभर टक्के लोकसभा मतदारसंघ फेररचना विधेयक होणार, असे सांगितले.
खासदार म्हस्के यांनी विधेयक पास होण्याचा दावा अन् दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादीकडून पाठिंबा मिळणार असल्याचा चर्चांवर, त्यांच्याच पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळल्यास आनंदच होईल, अशी आलेल्या प्रतिक्रियेमुळे राज्यातील राजकीय चर्चा ऐन थंडीत तापल्याचे चित्र आहे.
काँग्रेसने मात्र या विधेयकावर प्रचंड सतर्क आहे. खासदारांना दिल्लीच्या दिशेने येण्यासाठी सावध केले गेले आहे. सत्ताधारी भाजपच्या प्रत्येक रणनीतीवर लक्ष ठेवून आहेत. यातच हिवाळी अधिवेशन रद्द होण्याची शक्यता वर्तवत, थेट अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल, असा दावा देखील काँग्रेसकडून केला जात आहे. हिवाळी अधिवेशन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यामुळे नको आहे, असे सांगत काँग्रेसने सत्ताधारी भाजपला डिवचले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.