Supriya Sule : शरद पवारांच्या निवृत्तीच्या चर्चा सुप्रिया सुळेंनी फेटाळल्या; म्हणाल्या, "अजून पाच वर्षे..."

Supriya Sule Reacts on Sharad Pawar Retirement : एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी आणि पक्षाने भाजपप्रणित एनडीएमध्ये सहभागी व्हावे, याबाबत चर्चा सुरू असल्याचा दावा करण्यात आला होता.
Sharad Pawar Retirement | Supriya Sule Reacts | NCP
Sharad Pawar Retirement | Supriya Sule Reacts | NCPSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News, 24 Nov : जेष्ठ नेते शरद पवार हे राजकारणातून निवृत्त होणार असल्याच्या चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावल्या आहेत. शरद पवार यांच्या निवृत्तीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

"शरद पवार निवृत्त होणार नाहीत. कोणी निवृत्त व्हायचं, हे जनता ठरवणार. त्यांच्या राज्यसभेची अजून पाच वर्षे बाकी आहेत. मग ते निवृत्त कसे होतील?" असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याच्या राजकीय निवृत्तीबाबत अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध होणे संतापजनक असल्याचेही त्यांनी म्हटले.

एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी आणि पक्षाने भाजपप्रणित एनडीएमध्ये सहभागी व्हावे, याबाबत चर्चा सुरू असल्याचा दावा करण्यात आला होता. या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता सुळेंच्या प्रतिक्रियेमुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Sharad Pawar Retirement | Supriya Sule Reacts | NCP
Satej Patil : 'गोकुळ'चा वचपा सतेज पाटील 2029 ला काढणार...; 'कंडका पाडणार', 'आमचं ठरलंय' नंतर आता नवी टॅगलाईन चर्चेत

दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या चर्चेवर प्रतिक्रिया देताना शरद पवार एनडीएसोबत जातील, असे वाटत नसल्याचे स्पष्ट केले. शरद पवार यांचे संपूर्ण राजकीय आयुष्य धर्मांध शक्तींविरोधात लढण्यात आणि फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार जिवंत ठेवण्यात गेले आहे, असे राऊत म्हणाले.

Sharad Pawar Retirement | Supriya Sule Reacts | NCP
PMC Action : मंत्र्यांनंतर आता नगरसेवकांच्या निकटवर्तीयांचा नंबर; 'फोनाफोनी'ला न जुमानता आयुक्तांच्या कारवाईचा बुलडोजर थेट 2027 पर्यंत

काही लोकांना सत्तेत जाण्याची घाई झाली असेल आणि त्यामुळे फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार बाजूला ठेवले जात असतील, तर ते योग्य नाही, असेही त्यांनी सुनावले. ज्यांनी तुम्हाला मदत केली, त्यांनाच आता आराम करण्याचा सल्ला दिला जात आहे. तुमचा पक्ष फोडला गेला आहे, असे म्हणत राऊत यांनी संबंधितांवर निशाणा साधला. तसेच सुप्रिया सुळे एनडीएसोबत जातील, असे वाटत नसल्याचे सांगत त्या प्रखर फुले-आंबेडकर विचारांच्या असल्याचंही राऊतांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.