Supriya Sule Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Yashwantrao Chavan : यशवंतराव चव्हाण यांचा प्रशासनाला विसर? सुप्रिया सुळे थेट CM फडणवीसांना पत्र लिहिणार

Supriya Sule Statement : सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीला प्रशासन गैरहजर राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. चव्हाणसाहेब राष्ट्रीय नेते असल्याने त्यांचा मान राखणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले.

हेमंत पवार - Hemant Pawar
  • यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीला प्रशासन अनुपस्थित राहिल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिण्याची घोषणा केली.

  • चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते असून चीन युद्धावेळी त्यांच्या नेतृत्वावर देश अवलंबून होता, असा ऐतिहासिक संदर्भ सुळे यांनी दिला.

  • शेतकरी, जलजीवन मिशन कर्मचारी व शिक्षकांच्या आत्महत्यांबद्दल सरकारवर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप करत सुळे यांनी कर्जमाफीसंबंधी सरकारला जाब विचारला.

Karad, 25 November : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राज्याचे नाही, तर देशाचे नेते आहेत. चीनबरोबर ज्यावेळी भारताचे युद्ध झाले, त्यावेळी पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावरच सर्व जबाबदारी टाकली होती. हिमालय अडचणीत होता, त्यावेळी आपला सह्याद्री मदतीला धावून गेला होता, हा इतिहास आहे.

आज चव्हाणसाहेबांच्या पुण्यतिथीदिनी प्रशासन मात्र इथे कुठेही दिसले नाही, हे दुर्दैवी आहे. राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. सरकार येतील जातील, निवडणुका येतील जातील. मात्र, सरकार कोणाचेही असो काही प्रथा पाळल्या गेल्याच पाहिजेत. चव्हाणसाहेबांचा मानसन्मान ठेवलाच पाहिजे. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आजच कळवणार आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली.

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण Yashwantrao Chavan() यांच्या पुण्यतिथीनिमित्त कऱ्हाड (जि. सातारा) येथील समाधिस्थळी खासदार सुळे यांनी आज अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

आजचा महाराष्ट्र हा फक्त आणि फक्त पंडित जवाहरलाल नेहरू आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्यामुळेच झाला आहे. त्यापाठीमागे अनेकांचे योगदान आहे. त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे खासदार सुळे म्हणाल्या.

सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दरवर्षी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन करण्यासाठी येत असतात. मात्र यावेळी ते आले नाहीत कारण ते त्यांच्या कामात व्यस्त असतील, मला माहिती नाही. त्यांनी काय करावे, हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. मात्र, प्रशासनाकडून मला फार हालचाल दिसत नाहीत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून यशवंतराव चव्हाण हे राज्याचे नाहीत, तर देशाचे नेते आहेत. चीनबरोबर ज्यावेळी भारताचे युद्ध झाले, त्यावेळी पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावरच सर्व जबाबदारी टाकली होती. त्यामुळे त्या युद्धाचा दिल्लीत जेव्हा उल्लेख होतो, त्यावेळी हिमालय अडचणीत होता, त्यावेळी आपला सह्याद्री मदतीला धावून गेला होता, हा इतिहास आहे. तो कधीही विसरु शकत नाही. त्यांचे देशासाठी मोठे योगदान आहे, असेही त्यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, आज चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीदिनी प्रशासन मात्र इथे कुठेही दिसले नाही, हे दुर्दैवी आहे. त्याची ही खंत मनाला वाटते. राज्य सरकारने गांभिर्याने दखल घेतली पाहिजे. सरकार येतील जातील, निवडणुका येतील जातील, मात्र सरकार कोणाचेही असो काही प्रथा पाळल्या गेल्या पाहिजे. चव्हाण साहेबांचा मानसन्मान ठेवलाच पाहिजे. ते मी मुख्यमंत्री यांना आजच पत्र लिहून कळवणार आहे.

शेतकऱ्यांबरोबर जलजीवनचे कर्मचारीही आत्महत्या करत आहेत

सरसकट कर्जमाफी करू, हे मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकीआधी म्हटले होते. राज्यात दर तीन तासाला शेतकरी आत्महत्या होते, हे मंत्री मकरंद पाटील यांनी राज्य सरकारच्या वतीने केलेले स्टेटमेंट आहे. अशी स्थिती असतानाही योग्य वेळी त्यांनी आम्ही कर्जमाफी करु असे सांगितले आहे.

यही समय है सही समय है ही त्यांची टॅगलाईन आहे. ही वेळ कधी येणार आहे. शेतकऱ्यांबरोबर जलजीवन मिशनचे कर्मचारी, शिक्षकांच्या आत्महत्या होत आहेत. हे दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप या सरकारने केले आहे, हे मी जड अंतकरनाने सांगते, असेही खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले.

प्र.1: सुप्रिया सुळे यांनी नाराजी का व्यक्त केली?
उ: यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीला प्रशासन आणि प्रमुख नेते उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

प्र.2: सुळे यांचा इतिहासाचा कोणता मुद्दा त्यांनी मांडला?
उ: चीन युद्धावेळी नेहरूंनी संपूर्ण जबाबदारी यशवंतराव चव्हाण यांच्यावर सोपवली होती, हे त्यांनी अधोरेखित केले.

प्र.3: त्या मुख्यमंत्रीांना कोणत्या विषयावर पत्र लिहिणार आहेत?
उ: चव्हाण साहेबांचा मानसन्मान राखला जावा आणि प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी या विषयावर.

प्र.4: सुळे यांनी सरकारवर कोणता गंभीर आरोप केला?
उ: शेतकरी, जलजीवन मिशन कर्मचारी आणि शिक्षकांच्या आत्महत्या वाढल्यामुळे सरकारने कंबरडे मोडण्यासारखे पाप केले, असा आरोप त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT