Ajit Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दादांसोबत आघाडी का? सुप्रिया सुळे यांनी सांगितले कारण

Local body elections News : राज्यभरामध्ये वेगवेगळ्या युती आणि आघाड्या पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवताना पाहायला मिळत आहेत.
Supriya Sule during the protest at District Collector’s office demanding road work near Baneshwar temple in Bhor
Ajit Pawar, Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सध्या राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचे अर्ज सध्या दाखल केले जात आहेत. हे अर्ज दाखल होत असताना राज्यभरामध्ये वेगवेगळ्या युती आणि आघाड्या पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवताना पाहायला मिळत आहेत.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार म्हणाले, राज्यात नगरपरिषद, नगरपंचायती निवडणुका होत आहेत. या स्थानिक निवडणुका असून त्या कधीही आम्ही पक्ष म्हणून लढवल्या नाहीत. त्या-त्या जिल्ह्यात पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा. हा त्यांचा अधिकार आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एक प्रकारे अजित पवारांबरोबर आघाडी करण्यासाठी स्थानिक नेत्यांना मोकळीक दिली असल्याचे बोलले जात आहे.

Supriya Sule during the protest at District Collector’s office demanding road work near Baneshwar temple in Bhor
Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीचा उद्रेक; जुन्नरच्या नगराध्यक्षपद उमेदवारीचा वाद ‘मातोश्री’वर, संपर्कप्रमुखांनी बोलावली बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस ह्या वेगवेगळ्या लढल्या असल्याचे किंबहुना एकमेका विरोधात लढला असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही आघाडी का ? केली जाते याबाबत विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभरात सर्वच पक्ष एकामेकाशी युती आघाडी करताना पाहायला मिळत आहेत. युती आघाड्यांचे वेगवेगळ्या प्रयोग होताना दिसत आहेत.

Supriya Sule during the protest at District Collector’s office demanding road work near Baneshwar temple in Bhor
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा अजितदादांना मोठा झटका; बीडच्या राजकारणात फेरबदल, बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

राज्याच्या कानकोपऱ्यातून वेगवेगळ्या युती आघाड्यांच्या बातम्या सध्या माध्यमांवर पाहायला मिळत आहेत. या युती आघाड्यांचे चित्र सोमवार सायंकाळपर्यंत सबंध महाराष्ट्राभर स्पष्ट होणार असून कोण-कोणासोबत आघाडी आणि युती करणार हे दिसून येईल.

Supriya Sule during the protest at District Collector’s office demanding road work near Baneshwar temple in Bhor
BJP action on rebel leaders : बिहारमधील विजयोत्सवात भाजपकडून बंडखोरांवर कारवाई; काहीचं निलंबन, तर काहींना बजावल्या नोटीसा

अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. हे स्थानिक नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे इलेक्शन असल्यामुळे आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी काही बदल आणि आघाड्या करायचे झाले तर त्यात काही वावगे नाही. स्थानिक प्रश्नांसाठी आघाड्या करण्याची स्थानिक नेत्यांना सूट दिली. यामध्ये कोणालाच अडचण वाटण्यासारखे काही नाही, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी देखील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत असलेल्या आघाडीबाबत अप्रत्यक्षरीत्या ग्रीन सिग्नल दिला असल्याचे बोलले जात आहे.

Supriya Sule during the protest at District Collector’s office demanding road work near Baneshwar temple in Bhor
NCP Politics : थेट पक्षनेतृत्वाला इशारा देणाऱ्या इंदापूरमधील नेत्याला अजितदादांनी डावललं, अखेर मनासारखंच करत 'या' नेत्याला नगराध्यक्षपदाच्या मैदानात उतरवलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com