Harshwardhan Sapkal: यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटलांसारख्या नेत्यांनी जे केलं, त्याची सुरुवात हर्षवर्धन सपकाळ पुण्यातून करणार

Congress Political News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होणारे हे शिबिर अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर अनेक काँग्रेसचे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत असताना पाहायला मिळत आहेत.
Harshwardhan Sapkal .jpg
Harshwardhan Sapkal .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : काँग्रेस पक्षाची ऐतिहासिक चिंतन शिबिर परंपरा पुन्हा एकदा पुण्यातून सुरू होत आहे. येत्या 11 आणि 12 ऑगस्ट रोजी खडकवासला येथे काँग्रेसचे (Congress) राज्यस्तरीय निवासी चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होणारे हे शिबिर अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर अनेक काँग्रेसचे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत असताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पक्षाला बळकटी देण्याच्या दृष्टिकोनातून हे शिबिर अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

या शिबिरामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतची रणनीती आणि पुढील काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणूक लढवायची का 'एकला चलो'चा नारा द्यायचा याबाबत देखील विचार मंथन होणार असल्याचे सांगितले जात आहे.

पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी नुकतीच राज्याची कार्यकारणी जाहीर केली आहे या कार्य करण्यासाठी हे चिंतन शिबिर असणार आहे. त्यामुळे सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या शिबिराकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Harshwardhan Sapkal .jpg
Eknath Shinde: फडणवीस अन् अजितदादांची शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातच मोठी खेळी? शिंदे अस्वस्थ,आठवड्यात दुसरा दिल्ली दौरा

परंपरेचा पुनर्जन्म

काँग्रेस पक्षाची चिंतन शिबिरांची परंपरा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांनी या शिबिरांद्वारे पक्षाच्या ध्येयधोरणांना बळकटी दिली होती. स्वातंत्र्यानंतरही ही परंपरा बराच काळ सुरू होती; परंतु कालांतराने ती खंडित झाली आणि अखेरीस बंद पडली. हर्षवर्धन सपकाळ यांनी ही परंपरा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या शिबिराच्या माध्यमातून पक्षाच्या विचारधारेला नव्याने उजाळा देण्याचा आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे. शिबिराचे स्वरूप आणि नियोजन दोन दिवस चालणाऱ्या या शिबिराला काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Harshwardhan Sapkal .jpg
Pune Rave Party: 'पुणे रेव्ह पार्टी'त मोठा ट्विस्ट; प्रांजल खेवलकरांवर नवे धक्कादायक आरोप; परप्रांतीय मुली, 28 वेळा हॉटेलचं बुकिंग...

अंदाजे 250 ते 300 कार्यकर्ते आणि नेते या शिबिरात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण या भागांना या शिबिराचे यजमानपद देण्यात आले आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पक्षाने विविध समित्या स्थापन केल्या आहेत, ज्या शिबिरस्थळी येणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या निवास, भोजन आणि अन्य व्यवस्थांचे नियोजन करत आहेत.

पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी सोमवारी पुण्यातील काँग्रेस भवन येथे स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शिबिराच्या तयारीसाठी विविध जबाबदाऱ्या वाटून दिल्या. शिबिरात काँग्रेसचा इतिहास, ध्येयधोरणे आणि विचारधारा यावर सखोल चर्चा होणार आहे. यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ञ आणि मान्यवरांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.

Harshwardhan Sapkal .jpg
Uttam Jankar : एकनाथ शिंदेंमध्ये कर्णाचं दातृत्व काय दिसलं?; उत्तम जानकरांनी सांगितली 'ती' गोष्ट...

काँग्रेस पक्ष सध्या राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक राजकीय आव्हानांना सामोरे जात आहे. पक्षाची ढासळती स्थिती, कार्यकर्त्यांमधील नैराश्य आणि नव्या पिढीशी जोडण्याचे आव्हान यावर या शिबिरात मंथन होण्याची अपेक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com