Suresh Halvankar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Suresh Halvankar : भाजप शब्द पाळणार? सुरेश हाळवणकरांचा पत्ता कट होणार की विधान परिषदेवर घेणार?

Suresh Halvankar MLC Election : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आलेले माजी आमदार प्रकाश आवाडे यांचा मुलगा राहुल आवाडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेले माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना निवडणुकीपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हाळवणकरांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्द कार्यकर्त्यांना दिला होता.

Rahul Gadkar

Kolhapur News, 14 Feb : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आलेले माजी आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awada) यांचा मुलगा राहुल आवाडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेले माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना निवडणुकीपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हाळवणकरांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्द कार्यकर्त्यांना दिला होता.

सध्या विधान परिषदेचा रिक्त झालेल्या 5 जागांची निवडणूक लागली आहे. यासाठी भाजपकडून तीन, शिवसेनेकडून एक आणि राष्ट्रवादीकडून एक जण विधान परिषदेवर पाठवण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत. त्यामध्ये सुरेश हळवणकर (Suresh Halvankar) यांचा पत्ता कट होणार की त्यांना विधान परिषदेवर घेणार याची चर्चा आता अधिक रंगली आहे.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये या निवडणुकीत माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव आमदार राहुल आवाडे यांनी भाजपकडून (BJP) मैदानात शड्डू ठोकला. पण तत्पूर्वी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची उमेदवारी निश्चित समजली जात होती. महायुती स्थापन झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली.

प्रकाश आवाडे यांनी लोकसभा निवडणुकीतच उमेदवारीचा शब्द मागून घेत विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या घडामोडी माजी आमदार सुरेश हळवणकर यांचा गट नाराज झाला. ही नाराजी दूर करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी इचलकरंजीत मेळावा घेत विधान परिषदेवर घेण्याचा शब्द दिला.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेच्या रिक्त जागांची निवडणूक तारीख जाहीर करण्यात आली आहे. 27 मार्च रोजी ही निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी महायुतीचं पारडे जड आहे. सध्या तरी या निवड प्रक्रिया बिनविरोध होण्याची शक्यता आहे. कारण मतदान झाल्यास उमेदवाराला निवडून येण्यास ५७ मतांचा कोटा लागेल. तर महाविकास आघाडीकडे पक्षीय बलाबल कमी आहे.

भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून (Shivsena) कुणाची लॉटरी लागणार? कुणाला संधी मिळणार? याची उत्सकुता सगळ्यांना लागली आहे. भाजपकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या डझन वर आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुती (Mahayuti) झाल्याने पक्षातील अनेक इच्छुक यांना माघार घ्यावी लागली. इचलकरंजीतील माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या बाबतीत हीच परिस्थिती आहे. त्यामुळे भाजपकडे असलेल्या तीन जागांवर हळवणकर यांना घेणार का? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.

भाजपकडून तीन नाव निश्चित?

विधान परिषदेसाठी रिक्त झालेल्या जागांवर भाजपकडून तीन नावे निश्चित झाली आहेत. यामध्ये भाजपचे जेष्ठ नेते माधव भंडारी, दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर यांची नाव निश्चित केल्याचे समजते. बंद लिफाफात यांची नावे दिल्लीच्या वरिष्ठापर्यंत पोचवले आहेत. त्यांच्या निर्णयानंतरच या नावावर शिक्कामुहूर्त होणार आहे. त्यामुळे माजी आमदार सुरेश हळवणकर यांचा पत्ता कट होणार की? विधान परिषदेवर घेण्यात याची देखील चर्चा आता सुरू आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT