Nagpur News, 14 Feb : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) भरघोस यश मिळालं आणि राज्यात युतीचं बहुमताचं सरकार स्थापन झालं. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सध्या आघाडीतील नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचं पाहायला मिळत आहेत.
त्यामुळेच महाविकास आघाडीतील (Maavikas Aghadi) नेते पदाधिकारी आणि माजी आमदार मोठ्या प्रमाणात महायुतीतील मित्र पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. नुकंतंच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचं दिसत आहे.
मात्र, असं असतानाही काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमच्यासोबत या दोघांना मुख्यमंत्री बनवू अशी खुली ऑफर दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नानांना एवढा कॉन्फिडन्स कशामुळे आला? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
नाना पटोले यांनी धुलिवंदनाच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, सध्या अजितदादा आणि एकनाथ शिंदेंची परिस्थिती खूप वाईट आहे. त्यांचा पक्ष टिकेल की नाही, याची भीती दोघांच्या मनात आहे. भाजप त्यांना जगू देत नाही. भाजपची ती सवयच आहे.
देशात ज्यांच्यासोबत युती केली, त्यांना संपवण्याचे काम त्यांनी केलं आहे. भाजपने एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) सगळ्या योजना भाजपने बंद केल्या आहेत. त्यामुळे दोघांनी सावध रहावं, आम्ही त्यांच्यासोबत आहोत." तर यावेळी पटोलेंनी दोन्ही नेते आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू अशी थेट ऑफर दिली आहे.
ते म्हणाले, आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. अजितदादा (Ajit Pawar) आणि शिंदेंना आमच्याकडे बोलवणार आहोत. त्यांना पाठिंबा देऊ. दोघांना मुख्यमंत्रिपदाची आस लागली आहे. भाजपच्या अधिपत्याखाली ते दोघे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. त्यामुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना आलटून-पालटून मुख्यमंत्री बनवू."
दरम्यान, यावेळी त्यांनी नेत्यांना बुरा न मानो होली है नेत्यांना होळीच्या शुभेच्छा देत टोले देखील लगावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रकृती ठीक व्हावी असं म्हणतच आजकाल ते खूप फेकतात त्यांनी मोदींप्रमाणे खोटं बोलू नये, असा टोला त्यांनी फडणवीसांना यावेळी लगावला आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.