Maharashtra Cabinet Expansion Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sushma Andhare: भरतशेठ, शपथविधीसाठी शिवलेला कोट अॅमेझॉनवर विकायचा ? आता तरी भाजपच्या खोटेपणावर...

Maharashtra Cabinet Expansion: गोगावले यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे, वाईटदेखील वाटतं आहे.

Mangesh Mahale

Nanded: मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली, की शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांचे नाव समोर येते. शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात गोगावलेंची वर्णी लागेल, असे भाकीत राजकीय पंडितांनी केले आहे.

हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशीही चर्चा आहे. भरत गोगावले सध्या पंढरपूर दौऱ्यावर आहेत. ते आज विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झाले. मंत्रिमंडळात सहभाग होण्यासाठी भरतशेठ यांनी विठ्ठलाला साकडे घातले.

रुक्मिणीमातेला सांगणार...

"पांडुरंगाला आमची कणव असेल, तर तो मंत्रिमंडळाचा विस्तार करेल. पांडुरंगाला काय कोडं पडलं आहे, ते सोडव, असं आम्ही आता रुक्मिणीमातेला सांगणार आहोत. आता आमच्या हातात काही नाही. पांडुरंग आणि रुक्मिणीमातेने काय चमत्कार केला तरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे विधान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले आहे. त्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गोगावलेंना चिमटा घेतला आहे.

अधिवेशनापूर्वी चमत्कार होऊन आम्ही मंत्री होऊ...

"आता पांडुरंगाला काळजी आहे. त्याचा भक्त वाट पाहत आहे. देवाला दया आली तर हिवाळी अधिवेशनापूर्वी काही चमत्कार होऊन आम्ही मंत्री होऊ," अशी आशा गोगावलेंनी व्यक्त केली आहे.

गोगावलेंबाबत वाईट वाटतं...

"गोगावले यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे, वाईटदेखील वाटतं आहे. मंत्रिमंडळ विस्तार होईल या आशेने गोगावले यांनी शपथविधीसाठी कोट पण शिवला आहे. आता तो कोट कुठे अॅमेझॉनवर विकायचा का? असा चिमटा अंधारे यांनी काढला. मंत्रिमंडळ विस्तार ही त्यांची भाबडी आशा आहे. दादा आता तरी भाजपच्या खोटेपणावरील विश्वास कमी करा," असा सल्ला अंधारे यांनी भरत गोगावलेंना दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT