Sushma Andhare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राजेंद्र राऊतांच्या कार्यकर्त्याने तलवारीने हल्ला करूनही गुन्हा दाखल नाही : सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

ज्या रुग्णालयात हा माणूस आहे, त्या रुग्णालयाने अद्याप रिपोर्टही दिलेला नाही.

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : शिवसेनेच्या (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी बार्शीचे भारतीय जनता पक्ष पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भातील एक व्हिडिओ अंधारे यांनी व्हायरल केला आहे. त्या व्हिडिओतील व्यक्ती मला राजेंद्र राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी तलवारीने मारले, असे सांगितले आहे. त्यानंतरही आमदार राऊत यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झालेला नाही, असे आपल्या आरोपात म्हटले आहे. (Sushma Andhare's serious accusation against barshi's MLA Rajendra Raut)

महाप्रबोधन यात्रेनिमित्त सुषमा अंधारे या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान झालेल्या सभेत बोलताना अंधारे यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर आरोप केले आहेत.

एका सभेत बोलताना अंधारे यांनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी मला मारले असे सांगणारा व्हिडिओ लावला. त्या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती आपल्याला आमदार राऊत यांच्या कार्यकर्त्याने मारले असल्याचे सांगत आहे, असे सांगून अंधारे म्हणाल्या की, संबंधित व्यक्तीला तलवारीने मारले तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.

ज्या रुग्णालयात हा माणूस आहे, त्या रुग्णालयाने अद्याप रिपोर्टही दिलेला नाही. बार्शीतील संबंधित व्यक्तीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे त्या व्यक्तीवर तलवारीने हल्ला केल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. हल्ला करणारी व्यक्ती ही बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला.

दरम्यान, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावरही अंधारे यांनी टीका केली. त्या म्हणाल्या की, आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे आपले भाऊ आहेत. त्यांना खेकडा बिकडा म्हणू नका, असा टोमणा त्यांनी मारला.

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याबाबतही अंधारे यांनी भाष्य केले. ‘हे लोक संजय राठोड यांना क्लिनचीट देऊ शकतात, ते सोलापूर भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर काय बोलणार,’ असा सवालही शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT