Former corporator Ibrahim Chaudhary murder case Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Miraj Former NCP corporator murder case : राष्ट्रवादी माजी नगरसेवक चौधरी हत्या प्रकरण; संशयिताचा अपघाती मृत्यू नाही तर हत्या

Former corporator Ibrahim Chaudhary murder case : मिरज येथील माजी नगरसेवक इब्राहिम चौधरी यांचा 2017 मध्ये खून झाला होता. पण या खुनाच्या गुन्ह्यातील संशयिताचा अपघातात मृत्यू झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.

Aslam Shanedivan

Miraj News : मिरज येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक इब्राहिम चौधरी यांच्या हत्येमुळे 2017 साली पश्चिम महाराष्ट्र हादरून गेला होता. याचा अद्याप तपास सुरू असून या हत्येतील संशयिताचा अपघाती मृत्यू झाला आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण आले असून मयत समीर ख्वाजा शेख (वय 35, रा. मिरज) याच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दहा जणांना रायबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे समीर शेख याचा अपघाती मृत्यू झाला नसून त्याचीही हत्या करण्यात आल्याचे धागेदोरे पोलिसांना तपासात मिळाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी माजी नगरसेवक जुबेर चौधरी यालाही अटक केल्याने मिरजमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रायबाग तालुक्यातील कंचकरवाडी येथे मंगळवारी अपघातात एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला होता. तो मोटारसायकलस्वार समीर शेख होता. तर त्याचा मित्र फिरोज मुस्ताक रोहिले (वय 24, रा. ईदगाहनगर, मिरज) हा जखमी आहे.

यानंतर या अपघाताची वर्दी रायबाग पोलिसांनी पोलिसांना देण्यात आली. तर शेख याच्या कुटुंबाने देखील तक्रार दाखल केली. याच तक्रारीवरुन पोलिसांनी तपास पुढे सरकवला. ज्यात सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यात आले होते. याच सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोटारसायलकचा मोटारीने पाठलाग केल्याचे उघड झाले असून पाठलाग करून खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केला आहे. पोलिसांनी अधिक तपासासाठी मोटारसायकलचा पाठलाग केलेली मोटार व अपघातग्रस्त मोटारसायकल ताब्यात घेतली आहे. तर दहाजणांना अटक केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मृत समीर शेख हा माजी नगरसेवक इब्राहिम चौधरी यांच्या हत्याप्रकरणातील एक संशियत होता. याच्यासह सात जणांवर 2017 मध्ये चौधरी यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यातील सहाजणांना न्यायालयातून जामीन मंजूर केला होता. पण समीर याला न्यायालयाने जामीन रद्द करत मिरजमधून तडीपार केले होते.

यामुळेच समीर हा मागिल चार महिन्यांपासून रायबागमध्ये होता. मंगळवारी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी असल्याने तो मोटारसायकलवरून सांगली येथील न्यायालयात हजर होण्यासाठी येत असतानाच हा अपघात झाला. पण तो अपघात नसून समीर शेखचा काटा काढण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

समीर शेखचा अपघात यड्राव-अंकली रस्त्यावर कंचकरवाडीजवळ झाला. तर दवाखान्याला नेताना त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, समीर याचा अपघात नसून खून असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबाने दिल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. यातूनच हा अपघात नसून खून असल्याचे उघड झाले आहे.

चारचाकीने रेकी

दरम्यान समीर शेख याचा काटा काढण्यासाठी सांगलीतील एका चारचाकीने (सेंट्रो) रेकी करण्यात आली होती. यानंतरच सांगलीत खुनाचा कट रचून सुपारी दिल्याचेही पोलिस रेकॉर्डवर स्पष्ट झाले आहे. अधिक तपास निरीक्षक मंटूर करत आहेत.

याप्रकरणात माजी नगरसेवक जुबेर चौधरी, संजय कांबळे, सोहेल पाथरवठ, राजू पटेल, आबिद शेख (सर्व रा. मिरज) यांच्यासह दहा जणांचा समावेश आहे. तर अद्याप माजी नगरसेवक जुबेर चौधरी याचा भाऊ अरिफ याला अटक करण्यात आलेली नाही. सध्या रायबाग पोलिसांनी सांगली-मिरजेत तळ ठोकून तपासाला गती दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT