
Mumbai News, 28 Jan : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांच्या हत्या प्रकरणात त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांनी मोठा खुलासा केला आहे. बाबा सिद्दीकी यांनी हत्या होण्याआधी काही तासांपूर्वी डायरीत भाजपच्या एका बड्या नेत्याचं नाव लिहिलं होतं, असा जबाब झिशान यांनी पोलिसांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
त्यामुळे आता या हत्या प्रकरणी नव्या चर्चांना उधाण आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हत्येच्या दिवशी बाबा सिद्दिकींच्या डायरीत भाजप (BJP) नेते मोहित कंबोज यांचं नाव असल्याचा दावा झिशान सिद्दीकींनी आपल्या जबाबात केल्याचं सांगितलं जात आगे. बाबा सिद्दिकींना रोज डायरी लिहायची सवय होती. त्याप्रमाणे हत्येच्या दिवशी देखील डायरी लिहिली होती.
यामध्ये मोहित कंबोज यांचं नाव असल्याचं झिशान यांनी म्हटलं आहे. झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) यांनी पोलिस जबाबात इतर बिल्डर्सप्रमाणे मोहित कंबोज यांचे नाव घेत संशय व्यक्त केला आहे. आरोपपत्रात बिल्डर पृथ्वी चव्हाण, शिवालिक व्हेंचर्स, अदानी, शाहिद बलवा, नबील पटेल, विनोद गोएंका आणि ओंकार बिल्डर्स या विकासकांच्या नावांचा उल्लेख केला आहे.
तर वडिलांची हत्या वांद्रेतील पुर्नविकास प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यानेच झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात बाबा सिद्धीकींच्या हत्येचा आणि पुर्नविकास प्रकल्पाचा कोणताही संबध नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या बिष्णोई गँगकडून झाल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.
पोलिसांनी आरोपपत्रात बाबा सिद्धीकी यांची हत्या सलमान खान (Salman Khan) याच्याशी असलेली जवळीकता यातूनच झाल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकींवर हल्ला करणारा मुख्य शूटर शिवकुमार गौतम याने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात हे सांगितलं की, कुख्यात गुन्हेगार अनमोल बिश्नोईने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर 'दाऊद इब्राहिमशी संबंध आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात सहभाग' यावरून हल्ला करण्याचे आदेश दिले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.