Raju Shetti sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti News : 'स्वाभिमानी' लोकसभेच्या 6 जागा लढवणार; युती अन् आघाडीने आमच्या दारात येऊ नये!

Rahul Gadkar

Kolhapur News : आगामी लोकसभा निवडणुका जसजशी जवळ येत आहे तसं तसं वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपकडून यापूर्वीपासूनच रणनीती आखायला सुरुवात झाली असली तरी इंडिया आघाडीत मागील दोन दिवसांपासून वेग आला आहे. त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कंबर कसून मैदानात उतरणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. स्वाभिमानी राज्यातील सहा जागांवर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून त्याचा सर्वाधिक फटका हा इंडिया आघाडीलाच बसण्याची जास्त शक्यता वर्तवली जाते.

लोकसभा निवडणुकीवर राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले, लोकसभेच्या जागावाटप चर्चेमध्ये आम्ही फारसे लक्ष दिलेले नाही. आम्हांला महायुती आणि महाआघाडीचाही अनुभव वाईट आहे. आम्ही 6 जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलढाणा, परभणी या जागा आम्ही लढवणार आहोत.

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) सरकार असतानाच आम्ही बाहेर पडलो. मात्र, बाहेर पडल्यानंतर तुम्ही का बाहेर पडला याची विचार नाही कोणी केली नाही. आता देखील आमच्याशी कोणी संपर्क साधलेला नाही. आम्ही केलेल्या आक्षेपाचा खुलासाच होणार नसेल तर तिकडे जाऊन तरी काय उपयोग. अशी खंतही शेट्टींनी व्यक्त केली.

एक्झिट पोलवरून शेट्टी यांनी, सर्व्हेवर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे. मात्र, मतविभागणी करणे भाजपला चांगले जमले आहे. भाजपची (BJP) मते वाढलेली नाहीत पण विरोधी मतांमध्ये फूट पाडण्यात ते यशस्वी झालेत. केंद्र सरकारच्या कारभाराला महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनता कंटाळलेली असल्याचा टोला शेट्टी यांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेट्टी म्हणाले, आत्तापर्यंत देशातील 14 पंतप्रधानांनी जे कर्ज केलं नाही त्याच्या चौपट कर्ज एका पंतप्रधानाने दहा वर्षात केले आहे. मतविभागणी आणि संवेदनशील विषयात लोकांची डोकी भडकवायची ही त्यांची रणनीती यशस्वी होत आहे. फक्त मोदींना विरोध करून चालणार नाही तर तुम्ही जनतेसाठी काय करणार आहात? तेही सांगावं लागणार आहे.

भ्रष्टाचार, शिक्षण, शेती याविषयी तुमचे धोरण काय? हे सांगावं लागणार आहे. केंद्राच्या कृषी विधेयकावेळी अदानीच्या कार्यालयावर पहिला मोर्चा मी काढला होता. आम्ही पुन्हा महाविकास आघाडी सोबत गेलो तर च्या धोरणावर आक्षेप ठेवून बाहेर पडलो त्याचं काय याचे उत्तर आम्हालाच द्यावं लागेल, असेही शेट्टी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT