Shivsainik on Pratapgad  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिवसेनेवरील संकट दूर कर; लोटांगण घालत शिवसैनिकांचे भवानी मातेला साकडे...

सध्या शिवसेना Shivsena पक्षातच अंतर्गत वाद Internal disputes निर्माण झाला असून बंड पुकारलेल्या आमदारांच्या Action against MLAs विरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

अभिजित खुरासणे

महाबळेश्वर : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करत उभारलेल्या शिवसेनेतील अंतर्गत वाद मिटावा आणि पुन्हा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक एकत्र यावेत, यासाठी शिवसेनेच्या सांगलीतील शिलेदारांनी प्रतापगड गाठून भवानी मातेच्या मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत लोटांगण घालत माता भवानी मातेला साकडे घातले. राज्यावर आलेले संकट दूर व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

राज्यात शिवसेना पक्षात उभी फूट पडली असून शिवसेना पक्षाच्या ४२ आमदारांनी राज्य सरकार विरोधात बंड पुकारत प्रथम सुरत आणि आता गुवाहाटी येथे जाऊन राहिले आहेत. महाविकास आघाडीचे हे सरकार बरखास्त करा आणि भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करा, अशी मागणी करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख हे मात्र, या गोष्टी मान्य करताना दिसत नाहीत.

त्यामुळे सध्या शिवसेना पक्षातच अंतर्गत वाद निर्माण झाला असून बंड पुकारलेल्या आमदारांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. असे असताना बंडखोर आमदारांविरोधात राज्यभर आंदोलने होत आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांच्या भूमिकेच्या समर्थनार्थ देखील आंदोलने सुरू आहेत. त्यामळे राज्यातील शिवसैनिक मात्र पेचात सापडले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज सांगली शिवसेना शहर प्रमुख मयूर घोडके, उपशहर प्रमुख राम काळे, विभागप्रमुख दिनेश शेलार, अमोल कांबळे, शाखाप्रमुख अभिजीत कळसेकर, उपशाखाप्रमुख रोहन रनभिसे आदी पदाधिकाऱ्यांनी सांगलीवरून निघून छत्रपती शिवरायांचा प्रतापगड गाठला. प्रतापगडाच्या पायथ्यापासून आई भवानी मातेचे मंदिर ते छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत लोटांगण घालत माता भवानी मातेला साकडे घातले.

सध्या राज्यावर आलेले संकट दुर कर आणि रक्ताचे पाणी करत बाळासाहेब ठाकरे यांनी आणि शिवसैनिकांनी उभारलेल्या शिवसेनेतील अंतर्गत वाद मिटव. पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक एकत्र यावेत, अशी मागणी भवानी मातेच्या चरणी केली. यासाठी या शिवसेनेच्या शिल्लेदारांनी तुळजा भवानीच्या मंदिरात अनवाणी पायांनी लोटांगण घालत साकडे घातले. आता या शिवसैनिकांच्या भावना आई भवानी माता मान्य करणार का हे आगामी काळातील राजकिय घडामोडीतून दिसून येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT