Madha, 27 January : उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी माढा तालुक्यातून जिल्हा परिषद सात गटातून ४४ उमेदवारांनी, तर पंचायत समितीच्या १४ गणातून ७९ जणांनी माघार घेतली आहे. आता झेडपीच्या ७ जागांसाठी २० उमेदवार, तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. मात्र, भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांनी भुताष्टे पंचायत समिती गणातून माघार घेतल्याने तर्कविर्तकांना उधाण आले आहे.
दरम्यान, भाजपच्या (BJP) बड्या नेत्याच्या फोननंतर तालुकाध्यक्ष पाटील यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागल्याची खमंग चर्चा तालुक्यात आहे. त्यामुळे भाजपच्या तालुकाध्यक्षांचे पंचायत समितीचे स्वप्न भंगले आहे. या गणातून रणजित शिंदे यांचे समर्थक स्वाती हनुमंत गिड्डे यांना भाजपकडून पुरस्कृत करण्यात आले आहे.
या निवडणुकीत माजी आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) आणि संजयमामा शिंदे यांच्या गटासमोर खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजीत पाटील यांच्या गटाचा थेट सामना होत आहे. तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गटांत दुरंगी, तीन गटांत तिरंगी, तर मानेगाव जिल्हा परिषद गटात पंचरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान तालुक्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. खासदार मोहिते पाटील आणि आमदार पाटील यांच्या गटात राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट) आणि शिवसेना यांच्यात जागावाटप झाले आहे. माजी आमदार शिंदे बंधूंच्या गटात भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटात जागावाटप निश्चित झाले.
शिवसेना (उबाठा) आणि मोहिते पाटील–पाटील गटातील चर्चा निष्फळ ठरल्याने शिवसेना उबाठाने रांजणी, लऊळ, मोडनिंब व कुर्डू या चार गणांत स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. वंचित बहुजन आघाडीने मानेगाव व कुर्डू या दोन जिल्हा परिषद गटांत, तर रांजणी, टेंभुर्णी, कुर्डू, भोसरे व पिंपळनेर या पंचायत समिती गणांत वंचित उमेदवार दिले आहेत.
दरम्यान, भोसरे, बेंबळे व टेंभुर्णी गटांत दुरंगी, तर कुर्डू, मोडनिंब व उपळाई बुद्रूक गटांत तिरंगी लढत होणार आहे. मानेगाव गटातील पंचरंगी लढतीमुळे तालुक्याची राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
भोसरे गट
• शर्मिला विलास उबाळे (रा.कॉं.पा. – शरदचंद्र पवार)
• अश्विनी योगेश दळवे (रा.कॉं.पा.)
............................
रोपळे कव्हे पंचायत समिती गण
• छायादेवी कैलास करंडे (रा.कॉं.पा.)
• वैशाली तात्यासाहेब गोडगे (शिवसेना)
...........................................
भोसरे पंचायत समिती गण
• राहुल माणिक आखाडे (रा.कॉं.पा. – शरदचंद्र पवार)
• आशिष आनंद रजपुत (रा.कॉं.पा.)
• चांदणे रविंद्र बापू (वंचित बहुजन आघाडी)
• संतोष सदाशिव चांदणे (अपक्ष)
• जोतीराम गणपत बोबडे (अपक्ष)
मानेगाव जिल्हा परिषद गट
• सुहास विलास पाटील (रा.कॉं.पा.)
• सावंत पृथ्वीराज शिवाजी (भाजप)
• शिवाजी तानाजी शिरसट (वंचित बहुजन आघाडी)
• क्रांतीकुमार सुरेश पाटील (अपक्ष)
• विश्वजीत भारत पाटील (अपक्ष)
...........................
मानेगाव पंचायत समिती गण
• देशमुख पंडित तुकाराम (भाजप)
• पारडे दादासाहेब दत्तात्रय (रा.कॉं.पा. – शरदचंद्र पवार)
• दिलीप देवीदास देशमुख (अपक्ष)
......................................
दारफळ पंचायत समिती गण
• ठोंबरे जयश्री मधुकर (रा.कॉं.पा.)
• ठोंबरे मिराबाई आबासाहेब (भाजप)
• सोनाली मनोज साठे (अपक्ष)
उपळाई बुद्रूक जिल्हा परिषद गट
• पाटील हर्षदा निलेश (रा.कॉं.पा. – शरदचंद्र पवार)
• मोरे माधुरी तानाजी (भाजप)
• कालिंदा महादेव लवटे (राष्ट्रीय समाज पक्ष)
उपळाई बुद्रूक पंचायत समिती गण
• झाडबुके नितीन मदन (भाजप)
• देशमुख शशिकांत रामचंद्र (रा.कॉं.पा.)
भुताष्टे पंचायत समिती गण
• संतोष दत्तू दळवी (रा.कॉं.पा. – शरदचंद्र पवार)
• स्वाती हनुमंत गिड्डे (अपक्ष)
• राजकुमार महादेव लोंढे (अपक्ष)
कुर्ड जिल्हा परिषद गट
• ढाणे संभाजी धोंडीबा (रा.कॉं.पा.)
• ढेकणे बाळासाहेब हणुमंत (रा.कॉं.पा. – शरदचंद्र पवार)
• बाबुराव रामचंद्र बनसोडे (वंचित बहुजन आघाडी)
कुर्ड पंचायत समिती गण
• आशा भारत गायकवाड (शिवसेना – उबाठा)
• अमृता संदीप पाटील (रा.कॉं.पा.)
• भाग्यलक्ष्मी पवनराजे पाटील (अपक्ष)
अकोले खुर्द पंचायत समिती गण
• पाटील आकाश बबनराव (रा.कॉं.पा. – शरदचंद्र पवार)
• पाटील संभाजी बबनराव (रा.कॉं.पा.)
• प्रवीण तुकाराम वाघमारे (वंचित बहुजन आघाडी)
टेंभुर्णी जिल्हा परिषद गट
• अंजनादेवी शिवाजी पाटील (रा.कॉं.पा. – शरदचंद्र पवार)
• अमृता नागनाथ वाघे (भाजप)
रांझणी पंचायत समिती गण
• पवार तेजस्विनी गोविंद (रा.कॉं.पा. – शरदचंद्र पवार)
• पाटील सुनिता संजय (भाजप)
• स्मिता हरीदास माने (शिवसेना – उबाठा)
• अश्विनी सचिन झेंडे (वंचित बहुजन आघाडी)
• वैशाली दादासो कळसाईत (अपक्ष)
टेंभूर्णी पंचायत समिती गण
• खरात प्रतिभा परमेश्वर (भाजप)
• जयश्री बुद्धभूषण लोंढे (रा.कॉं.पा.)
• सातपुते जयश्री कैलास (शिवसेना)
• डिंपल संदीप साळवे (काँग्रेस)
• पुनम विशाल नवगिरे (वंचित बहुजन आघाडी)
बेंबळे जिल्हा परिषद गट
• सविता संजय कोकाटे (शिवसेना)
• ढवळे रोहिणी तुकाराम (भाजप)
पिंपळनेर पंचायत समिती गण
• बिभीषण भागवत डांगे (भाजप)
• संजय मधुकर ढवळे (शिवसेना)
• शुभम नवनाथ फुगे (शिवसेना – उबाठा)
• संघर्ष भाऊसाहेब पांडगळे (वंचित बहुजन आघाडी)
• अजिनाथ बाबुराव जाधव (अपक्ष)
बेंबळे पंचायत समिती गण
• अनपट पोपट नामदेव (रा.कॉं.पा. – शरद पवार)
• हुंबे विष्णू महादेव (भाजप)
• परमेश्वर अभिमान गायकवाड (अपक्ष)
मोडनिंब जिल्हा परिषद गट
• वंदना शिवाजी कांबळे (भाजप)
• प्रभावती भारत शिंदे (रा.कॉं.पा.)
• अश्विनी अंकुश लोकरे (अपक्ष)
लऊळ पंचायत समिती गण
• सनिता राजेंद्र कोळी (शिवसेना – उबाठा)
• शितल दिगंबर भोंग (रा.कॉं.पा.)
• सोनाली दिगंबर माळी (भाजप)
• प्रियंका विष्णू नलवडे (अपक्ष)
• अभिलाषा प्रमोद वसेकर (अपक्ष)
मोडनिंब पंचायत समिती गण
• प्राजक्ता प्रतापसिंह पाटील (रा.कॉं.पा.)
• मंदाकिनी चांगदेव वरवडे (भाजप)
• मनिषा दीपक सुर्वे (शिवसेना – उबाठा)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.