Mangalvedha Election : नगराध्यक्षांचे पुत्र, माजी सभापती, काँग्रेस तालुकाध्यक्षांची माघार; मंगळेवढ्यात भाजप विरुद्ध सर्वपक्षीय आघाडी

Zilla Parishad- Panchayat Samiti election 2026 : मंगळवेढा तालुक्यात उमेदवारी अर्ज माघारीमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत चुरशीच्या लढती रंगणार आहेत. अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे.
Solapur ZP Election
Solapur ZP ElectionSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 27 January : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवेढा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 39, तर पंचायत समितीच्या 80 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या 04, तर पंचायत समितीच्या 08 जागांसाठी तब्बल 38 अर्ज निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी सामना होत आहे. मंगळवेढ्यात पुन्हा एकदा भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढाई असणार आहे.

मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांचे चिरंजीव आणि खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, माजी समाजकल्याण सभापती, माजी पंचायत समिती सदस्य, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष या प्रमुखांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत, त्यामुळे मंगळवेढ्यात बहुतांश ठिकाणी भाजप आणि सर्वपक्षीय आघाडी असा सामना होणार आहे.

मंगळवेढा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटासाठी 52 उमेदवारांनी, तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी 105 उमेदवारी अर्ज छाननीनंतर वैध ठरले आहेत. जिल्हा परिषदेच्या 39, तर पंचायत समितीच्या 80 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती.

माघारीनंतर दामाजी नगर व भोसे जिल्हा परिषद गटातमध्ये तिरंगी, हुलजंती येथे दुरंगी तर लक्ष्मी दगडी गटात पंचरंगी लढत होत आहे. पंचायत समिती गणांमधील दामाजी नगर, हुलजंती, चोखामेळा नगर या गणांमध्ये दुरंगी, तर बोराळे, मरवडे, रड्डे ,भोसे, या गणात तिरंगी, तर लक्ष्मी दहिवडी गणात सात उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उरतले आहेत

Solapur ZP Election
Rajendra Raut : माझी अख्खी इस्टेट पार्टीसाठी जाऊ द्या; मी त्यांच्या बापालाही भीत नाही : राजेंद्र राऊतांचे विरोधकांना चॅलेंज

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दिवसभरामध्ये मंगळवेढा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांनी दामाजी नगर, भोसे या जिल्हा परिषद गटाबरोबर लक्ष्मी दहिवडी गणातील उमेदवारी अर्ज मागे घेतली आहे. तसेच, माजी समाजकल्याण सभापती शीला शिवशरण आणि माजी पंचायत समिती सदस्य उज्वला मस्के यांनी लक्ष्मी दहिवडी गटातील उमेदवारी अर्ज मागे घेतला.

सध्या भारतीय जनता पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र, त्यांच्या विरोधात लढण्यासाठी सोमवारी दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्या, त्यामुळे आज दिवसभर उमेदवारी मागे घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले जात होते. भोसे गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून एकमेव अर्ज दाखल झालेले सिद्धेश्वर रणे, काँग्रेसचे राज्य सचिव अँड रवीकरण कोळेकर यांनी, तर तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी रड्डे गणातील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक भाजप विरुद्ध सर्वपक्षीय आघाडी अशी लढत होणार आहे. येत्या आठ दिवसांतील राजकीय घडामोडी निर्णय ठरणार आहेत.

अर्ज माघारीनंतर जिल्हा परिषद गटातील उमेदवार

संत दामाजीनगर : रमेश भांजे (भाजप), महावीर ठेंगील (तीर्थक्षेत्र विकास आघाडी), अमोल टेळे (अपक्ष)

हुलजंती : संगीता दुधाळ (भाजप), जयश्री माने (राष्ट्रवादी)

लक्ष्मी दहिवडी : करुणा शिवशरण (भाजप), कविता खडतरे(काॅग्रेस), कोमल ढोबळे (राष्ट्रवादी), प्रतिभा शिवशरण(वंचित बहुजन आघाडी), ज्योती सोनवले(अपक्ष)

भोसे : प्रदीप खांडेकर(भाजप), बसवराज पाटील (तीर्थक्षेत्र विकास आघाडी),बापू मेटकरी(वंचित बहुजन आघाडी)

........................................................................

Solapur ZP Election
Akola: काठावरच्या भाजपला शरद पवारांचा पाठिंबा; अकोल्यात सत्तेचा मार्ग मोकळा! महापौर अन् उपमहापौरांच्या नावावरही शिक्कामोर्तब

पंचायत समिती गण

संत दामाजी नगर :- जयश्री शिंदे (तीर्थक्षेत्र विकास आघाडी)सविता कोकरे(भाजप)

-----

बोराळे : जयश्री कवचाळे(भाजप),सुमैया तांबोळी (राष्ट्रवादी) सारिका धसाडे (अपक्ष)

-------

हुलजंती : मल्लिकार्जून मल्लाळे(भाजप),महादेव पेटर्गे (तीर्थक्षेत्र विकास आघाडी)

--------

मरवडे : उन्नती पवार (राष्ट्रवादी), मोहिनी गणपाटील(भाजप),मीनाक्षी सूर्यवंशी(अपक्ष)

----

संत चोखामेळानगर : दीपाली ताड (भाजप), संगीता लेंडवे (तीर्थक्षेत्र विकास आघाडी),

----

लक्ष्मी दहिवडी : विनायक यादव(भाजप),आबा लांडे (शिवसेना),काकासाहेब मोरे(तीर्थक्षेत्र विकास आघाडी) महादेव ढोणे(वंचीत बहुजन आघाडी), काशीलिंग रणदिवे(आम आदमी),दिपक आसबे व संतोष माने (अपक्ष)

-----

भोसे : आप्पा निकम (भाजप),कर्मवीर आवताडे(शिवसेना), प्रदीप मेटकरी(काॅग्रेस)

------

रड्डे : सुरेश कांबळे (तीर्थक्षेत्र विकास आघाडी), दत्तात्रय कांबळे(भाजप), साधू गेजगे(वंचित बहुजन आघाडी)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com