Chandrashekhar Bawankule, Udhav Thackeray sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ठाकरे सरकारची हिंमत झाली नाही... ते धाडस शिंदे, फडणवीसांनी दाखवले....

भाजपचे प्रदेशाध्यक्ष BJP State President आज साताऱ्याच्या Satara दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत आज भाजपची आगामी निवडणुकांतील रणनिती Election strategy ठरणार आहे.

Umesh Bambare-Patil

सातारा : प्रतापगड उत्सव समिती, विश्व हिंदु परिषद तसेच हिंदुत्ववादी संघटनांच्या मागणीनुसार न्यायालयाच्या आदेशाने प्रतापगडावरील अतिक्रमणे काढली आहेत. त्यासाठी शिंदे, फडणवीस सरकारचे मी अभिनंदन करतो. उद्धव ठाकरेंच्या सरकारची हिंमत झाली नाही ते धाडस शिंदे, फडणवीस सरकारने दाखवत अतिक्रमणे हटवली, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आज साताऱ्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत आज भाजपची आगामी निवडणुकांतील रणनिती ठरणार आहे. आज सकाळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एका खासगी हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रतापगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेवर भाष्य केले.

बावनकुळे म्हणाले, प्रतापगड उत्सव समिती, विश्व हिंदु परिषद तसेच हिंदुत्ववादी संघटनांची सातत्याने अफझल खान कबरीशेजारील अतिक्रमणे काढण्याची मागणी होती. त्यासाठी त्यांची अनेक वर्षे आंदोलने झाली. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशाने शिंदे, फडणवीस सरकारने हे अतिक्रमण काढले आहे.

बावनमुळे म्हणाले, मी शिंदे, फडणवीस यांच्या सरकारचे आभार मानून अभिनंदन करतो. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने हा प्रश्न मतांच्या लालसेपोटी ही अतिक्रमणे काढण्याची त्यांची हिम्मत झाली नाही. ते धाडस शिंदे, फडणवीस सरकारने दाखवले आणि प्रतापगडावरील अतिक्रमण काढले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT