Sindhudurg News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाला आहे. लोकसभेवेळी जनतेनं भाजपला नाकारत महाविकास आघाडीवर विश्वास टाकला होता. पण विधानसभा निवडणुकीत उलट चक्र फिरलं आणि महाविकास आघाडीला म्हणावे तसे यश मिळाले नाही. शिवसेना ठाकरे गटाला सर्वाधिक फटका सहन करावा लागला आहे. यामुळे राज्यात शिवसेना ठाकरे गटाला मरगळ आली आहे. अशीच मरगळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात आली आहे. ती झटकून काढण्यासाठी शिवसेना ठाकरे गट प्रयत्न करत आहे.
अशातच शिवसेना ठाकरे गटाला सक्षम विरोधक म्हणून पुढे आणण्यासह शहराचे विकासात्मक प्रश्न सत्ताधाऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे युवासेना जिल्हाउपप्रमुख निनाद देशपांडे यांनी सांगितले आहे. तर यासाठी गरज पडल्यास पालकमंत्री नीतेश राणे यांचीही भेट घेऊ असेही देशपांडे यांनी सांगितले आहे. देवगड येथील संपर्क कार्यालयात देशपांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी माजी नगरसेवक विकास कोयंडे उपस्थित होते.
ठाकरेगट शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुखांकडे दिला. यावरून जिल्ह्यातील ठाकरे गटात चुळबूळ सुरू झाली होती. मात्र त्यांनी आपला राजीनामा हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्याचे देशपांडे यांनी म्हटलं आहे.
साटम हे शांत, संयमी असून त्यांनी मागील सुमारे 10 वर्षे संघटना वाढीसाठी योगदान दिले होते. त्यांनी पदाचा राजीनामा दिला असला तरी ते कुठल्याही पक्षात जाणार नाहीत, असा विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला आहे. तर साटम हे शांत, संयमी असून त्यांनी मागील सुमारे 10 वर्षे संघटना यांच्या पाठीशी ठाकरेगट शिवसेना खंबीरपणे उभा असेल असेही देशपांडे यांनी म्हटलं आहे.
तालुक्याला प्रथमच पालकमंत्रिपद मिळाल्याचा आनंद असून जनतेच्या प्रश्नासाठी पालकमंत्र्यांची भेट घेतली र्जाइल. सक्षम विरोधक म्हणून आवश्यक त्यावेळी जबाबदारी बजावू असे देशपांडे यांनी म्हटलं असून, ज्यांना पक्षातून दुसर्या पक्षात जायचे आहे, त्यांनी जरूर जावे. मात्र, शिवसेना कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून त्यांना निवडून आणले होते. याची जाणीव ठेवावी. पदाचे राजीनामे देऊनच त्यांनी खुशाल कोणत्याही पक्षात प्रवेश करावा, असा टोलाही देशपांडे यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.