
Pune News : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून आता जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या देखील नियुक्त्या झाल्या आहेत. भाजपने अनेक ठिकाणी आपल्या मंत्र्यांना पालकमंत्री करून बळ दिले आहे. असेच बळ भाजपने नितेश राणे यांना भाजपने दिले असून त्यांना पालकमंत्री बनवले आहे. यानंतर नितेश राणे यांनी थेट माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. नितेश राणे यांनी ठाकरे चपट्या पायाचे असल्यानेच जिल्ह्याच्या विकास थांबल्याची टीका केलीय.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चीपी विमानतळाचे उद्घाटन केले होते. मात्र अनेक अडथळ्यांमुळे येथील विमान वाहतूक वारंवार बंद पडत आहे. याच मुद्द्यावरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विमानतळाचे उद्धाटन झाले त्यावेळी कोरोनाचा काळ होता. त्यावेळी त्याचे उद्घाटन तत्कालीन चपट्या पायाच्या मुख्यमंत्र्यांनी केले. ते आता बंद पडत चाललं आहे, अशी टीका आहे.
चांगले लोकं सत्तेत आले, त्या त्या पदावर बसले की सगळी कामे व्यवस्थित सुरू होतात. यालाही पायगुण चांगला असावा लागतो. काही गोष्टींना योग यावा लागतो आणि सर्वांत महत्त्वाचा म्हणजे पायगुणही चांगला असावा लागतो.
गेल्या दहा वर्षांत जिल्ह्याच्या विकासाला अपशकुनी पायगुणांमुळे खीळ बसली होती; पण आता झपाट्याने जिल्ह्यात विकासकामे होत राहतील. या मतदारसंघाचा बॅकलॉग भरून काढला जाईल. त्यांच्याच पायगुणामुळे या रखडलेल्या पुलाचे लोकार्पण होत आहे. ज्यामुळे शासनाचे मोठे नुकसान झाले होते, असेही नितेश राणे यांनी ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटलं आहे.
ठाकरे यांनी चपट्या पायाने चिपी विमानतळाचे उद्घाटन केले. तेथील विमानसेवा बंद झाली. आता उद्घाटनाची पाटी कशी बदलता येईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असंही यावेळी राणे म्हणाले.
यावेळी नितेश राणेंनी ठेकेदारांना इशारा देताना, मनमानी कराल तर काळ्या यादीत टाकू असाही इशारा दिला आहे. जो ठेकेदार मनमानी करेल, त्याला काळ्या यादीत टाकणार, कारण हा पैसा जनतेचा आहे. तुमच्या बापाचा नाही, असा इशारा पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.