Narayan Rane News : ज्यांनी स्वत: राजीनामा देऊन मुर्खपणा केला, त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा, म्हणणे मूर्खपणाचे आहे. निवडणुकीत मंगळसूत्र भाजपचे घातले आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांचा हात धरुन गेला. आता आम्हाला २०२४ पर्यंत आम्हाला वेळ आहे, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
मंत्री नारायण राणे Narayan Rane यांनी आज खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांच्या समवेत जलमंदीर या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंत्री भागवत कराड, माजी आमदार आनंदराव पाटील आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर Udhav Thackeray निशाणा साधला.
नैतिकता असेल तर शिंदे, फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यावर मंत्री राणे यांना विचारले असता ते म्हणाले, ज्यांनी स्वत: राजीनामा देऊन मुर्खपणा केला, त्यांनी सरकारने राजीनामा द्या, म्हणणे मूर्खपणाचे आहे.
निवडणुकीत मंगळसूत्र भाजपचे घातले आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांचा हात धरुन गेला. आता २०२४ पर्यंत आम्हाला वेळ आहे. त्यामुळे नैतिकता नसलेल्या माणसाने आमच्यावर बालू नये. गप्प घरातच बसावे, मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्या असे म्हणण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.