Pramod sawant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pramod Sawant : चंदगडमध्ये गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीत टाकली वादाची ठिणगी; थेट उमेदवार केला जाहीर

Goa CM Dr. Pramod Sawant In Kolhapur : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चंदगडमध्ये येऊन 'जय जवान, जय किसान महा मेळाव्यात भाषण करत महायुतीमध्ये पुन्हा एकदा ठिणगी टाकली आहे.

Rahul Gadkar

Chandgadh News : चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये वादाला तोंड फुटले आहे. महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जात असताना भाजपकडून त्याला प्रति आव्हान दिले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय शिवाजीराव पाटील यांची बंडखोरी अटळ समजली जाते. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चंदगड मध्ये येऊन महायुतीमध्ये पुन्हा एकदा ठिणगी टाकली आहे.

शिवाजी पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करत थेट महायुतीलाच आव्हान दिले आहे. नुकताच शिवाजीराव पाटील यांचा शेतकरी मेळावा पार पडला. त्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घोषणा करत खळबळ उडवून दिली आहे. चंदगड येथे झालेल्या मेळाव्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बोलताना, काँग्रेसने याआधी फक्त हाताचा चिन्ह वापरलं मात्र त्या हाताला काम मिळावं यासाठी काहीही केलं नाही.

काँग्रेसने कित्येक वर्ष गरीबी हटावचा नारा दिला मात्र ती गरिबी हटली नाही. मात्र आता गरीब लोकांसाठी केलेल्या वेगवेगळ्या योजनांमुळे लोकांच आयुष्य सुखर झालं आहे. चंदगड विधानसभेत कमळ फुलवण्यासाठी शिवाजी पाटील काम करत आहेत. यावेळेस शिवाजी पाटील यांना आमदार करायचं आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा पाठिंबा शिवाजी पाटील यांनाच असेल, असे प्रमोद सावंत (Pramod Sawant) म्हटले आहेत.

शिवाजीराव पाटील (Shivajirao Patil) गेल्या वेळी पराभूत झाले नसते तर हा मतदारसंघ अजून पुढे गेला असता. पर्यटनाच्या बाबतीत गोवा आणि महाराष्ट्रातील चंदगडने एकत्रित काम केलं पाहिजे. डबल इंजिनचं सरकार असून सुद्धा गेल्या पाच वर्षात चंदगडचा अपेक्षित विकास झाला नाही. पुढच्या पाच वर्षात चंदगड विधानसभेचा विकास करण्यासाठी शिवाजी पाटील यांच्या सोबत राहा. शेतकऱ्यांना महिलांना सन्मान देण्याचं काम मोदी सरकारने केला आहे . युवकांच्या हाताला काम देण्याचे काम फक्त मोदी सरकारने (Modi Government) केला आहे. असेही प्रमोद सावंत म्हणाले आहेत.

दरम्यान प्रमोद सावंत यांनी शिवाजीराव पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. विद्यमान आमदार राजेश पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील प्रमोद सावंत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT