chembari Gest house sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

चेंबरी विश्रामगृहाच्या खर्चाची होणार अधिकाऱ्यांकडून वसुली...

कोयना Koyana चेंबरीचे Chembari निकृष्ठ दर्जाचे कामाची तपासणी Inspection व चौकशी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे PWD मुख्य अभियंताची Chief Engineer नियुक्ती करण्यात आली आहे.

विजय लाड

कोयनानगर : कोयनानगर येथील चेंबरी या विश्रामगृहाचे काम दर्जाहीन व निकृष्ठ केल्याचा ठपका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ठेऊन त्यांनी या कामाच्या चौकशीचे आदेश जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत यांना दिले होते. दरम्यान, या प्रकरणी कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता एच.व्ही.गुणाले यांनी कोयना प्रकल्पाचे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे.

गुणवत्ता व दर्जाचे देशात दुसरे नाव असलेल्या कोयना प्रकल्पाला खाबुगिरीने बदनाम केल्यामुळे ही परंपरा मोडीत निघाली आहे. शासनाने दिलेले दोन कोटी ४० लाख रूपयांचा निधी खर्च करून कोयनानगर येथे उभारलेल्या चेंबरी या विश्रामगृहाचे उदघाटन १६ मे ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. उदघाटन करून चेंबरीची पाहणी केल्यानंतर हे काम निकृष्ट झाले असल्याचा ठपका दस्तुरखुद्द अजित पवार यांनी ठेऊन याप्रकरणी जलसंपदा सचिव विलास राजपुत यांना या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

याबाबत जलसंपदा सचिव विलास राजपूत यांच्याशी संपर्क साधला असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोयना प्रकल्पाच्या निकृष्ठ कामाबाबत ठपका ठेवल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांची चौकशी व तपासणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एका महिन्यात ते तपासणी करून याचा अहवाल देतील. यात दोषी असणाऱ्यांकडून चेंबरीच्या कामाची वसुली केली जाईल.

या प्रकरणी कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता एच.व्ही गुणाले यांनी कोयना प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करून त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता एच.व्ही गुणाले म्हणाले, संगतमताने हे काम झाले आहे याला अधिकारी व ठेकेदार दोषी आहेत. कोयना प्रकल्पाच्या गौरवशाली नावाला गालबोट लावण्याचे काम कोणी करु नये.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT